नागपूर :- पोलीस ठाणे कळमणा हद्दीत प्लॉट नं. ३९२, समालोचन सोसायटी, पार्वती नगर, वांजरा वस्ती, कळमणा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी शमशेर खान वल्द गुलशेर खान, वय ५५ वर्षे, यांचे राहते घराला कुलूप लावुन परिवारासह लग्नाचे कार्यक्रमाला गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून लोखंडी आलमारीत ठेवलेले रोख १,००,०००/- रू. व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण किंमती अंदाजे २,२०,५००/- रू चा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कळमणा येथे सपोनि मुसळे यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५ (अ), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून, पुढील तपास करीत आहेत.