नागरिकांनी घेतला विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ 

• विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्पास प्रारंभ

• विविध झोन मध्ये उस्फूर्त प्रतिसाद  

नागपूर :- केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना थेट लाभ मिळावा या उद्देशाने देश पातळीवर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेंतर्गत आयोजित विविध शिबिरांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर मनपातर्फे शहरी अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने धंतोली झोन येथील गजानन मंदिर, बालाजी नगर, प्रभाग क्र-३३ आणि राजाबक्षा हनुमान मंदिर परिसर, प्रभाग क्र.१७ तसेच हनुमान नगर झोन येथील चांदणी मैदान हनुमान नगर, प्रभाग क्र. ३१ आणि एम.एस.ई.बी. नवीन सुभेदार ले-आउट, प्रभाग क्र.३२ येथे विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ घेतला तसेच शिबिरांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवित सर्वांनी विकसित भारतासाठीची शपथ घेतली. यावेळी धंतोली झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे, हनुमान नगर झोनची सहायक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी संबधित झोन मध्ये उपस्थित होते.

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित विशेष शिबिराच्या माध्यमातून एका छताखाली प्राप्त होत असलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ समस्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. मनपाद्वारे अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ‘विकसित भारत संकल्प यात्रेतील योजनांची माहिती, प्रचार व प्रसिद्धीसाठी सुसज्ज व्हॅन्स अर्थात रथ माध्यमातून केले जात आहे. मनपाद्वारे झोननिहाय पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, अमृत योजना आणि ई-बस या योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय शिबिरांमध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, पी.एम.स्वनिधी बद्दल माहिती तसेच असंसर्गजन्य आजार निदान व उपचार देखील दिल्या जात आहेत. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येत यात्रेचा लाभ घावा असे आवाहन मनापाद्वारे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सफाई कर्मचा-यांसाठी मनपा बांधणार सदनिका

Wed Feb 7 , 2024
– लवकरच तयार होणार डीपीआर : अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांची सफाई कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींशी बैठक नागपूर :- नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत सफाई कर्मचा-यांकरिता श्रम साफल्य योजनेंतर्गत मनपातर्फे सदनिका बांधण्यात येणार आहेत. मौजा नारी येथील जागा यासाठी निश्चित करण्यात आलेली असून येत्या काही महिन्यांत यासंदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) राज्य शासनाला सादर केला जाईल, अशी माहिती मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com