नागपूर :- पोलीस ठाणे धंतोली हद्दीत काँग्रेस नगर, नागपूर येथे राहणाऱ्या डॉ. शिल्पी सुद यांचे सफल हॉस्पीटलचे बांधकाम सुरू असतांना, दोन अज्ञात चोरट्याने बांधकाम साईडवरील दुसऱ्या माळयावरील रूमच्या दरवाज्याचे लॉक तोडुन, आत प्रवेश करून, रूम मधील ईलेक्ट्रीकचे वायर, पाईप, व्हॉल्व व ईतर साहीत्य असा एकुण किंमती अंदाजे १,६९,९७९/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी बांधकाम साईडवरील कामगार फिर्यादी डिंगावर रामदासजी खाटीक, वय ३१ वर्ष, ग. पिपव्य, हुडकेश्वर, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे धंतोली येथे मपोउपनि, सोनुने यांनी अज्ञात आरोपींविरूध्द कलम ३०५, ३(५), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.