– 40 गावातील शेतकरी व घरगुती ग्राहकांना योग्य दाबाचा व शाश्वत वीजपुरवठा मिळणार
नागपूर :- महावितरणच्या मौदा विभागा अंतर्गत असलेल्या 33/11 केवी ऐरोली उपकेंद्रातील 5 एमव्हीए रोहीत्राची क्षमतावाढ करुन त्यास 10 एमव्हीए करण्यात आली कृषी पंप वीज जोडणी धोरण- 2020 च्या अन्वये करण्यात आलेल्या या रोहीत्राच्या क्षमतावाढीमुळे ऐरोली उपकेंद्र अंतर्गत असलेल्या 40 गावातील शेतकरी तसेच घरगुती ग्राहकांना योग्य दाबाचा व शाश्वत वीजपुरवठा मिळण्यास मदत होणर आहे. या नवीन रोहीत्राची चाचणी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक.सुहास रंगारी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि नागपूर ग्रामीण अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांच्या उपस्थितीत नुकतीच करण्यात आली.
कृषी पंप वीज धोरण- 2020 अंतर्गत वसुल झालेल्या थकबाकीतील रकमेचा वापर करुन संबंधित ग्रामिण भागातील नवीन वीजेच्या पायाभुत सुविधा उभारणी अथवा असलेल्या पायाभुत सुविधेच्या सक्षमीकरणासाठी केला जातो. याच निधीमधून ऐरोली येथील उपकेंग्रातील रोहीत्राची क्षमतावाढ करण्यात आली. रोहीत्राच्या चाचणी प्रसंगी मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता रुपेश टेंभुर्णे, चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता योगेंद्र निचत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनिल पांडे, रामटेक उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता भारत बालपांडे आणि सहायक अभियंता सुभाष चवरे व नितीन महाडिक यांच्यासह महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर