नियुक्तीपत्र थेट हातात मिळाल्याने उमेदवारांना आनंद…

भंडारा : महाराष्ट्र दिनाच्या पोलीस मैदानावरील मुख्य कार्यक्रमात सरळसेवा व अनुकंपा तत्वावर नियुक्त उमेदवारांना आज मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्तीपत्र थेट हातात मिळाल्याने उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

आज वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने अभिजीत उके, आशिर्वाद सोनपिंपळे, शुभम मेश्राम, दिपम दहीवले, महसूल विभागाच्या वतीने पेरश हारोडे, पंकज कसारे, प्रशिक जनबंधु, अभिषेक बागडे, धिरज सुखदेवे व जुही क्षिरसागर यांना भुकरमापक म्हणून नियुक्तीपत्रे देण्यात आली.

सार्वजनिक आरोग्य विभागातर्गत अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. सचिन चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी म्हणून डॉ. अमरदिप नंदेश्वर तर अतिरिक्त जिल्हा चिकीत्सक संवर्गात डॉ. अतुलकुमार टेंभुर्णे व बधिरीकरण तज्ज्ञ म्हणून डॉ. राहुल सुरेश भागडे यांना नियुक्ती प्रमाणपत्र प्राप्त झाले. तर अनुकंपा तत्वावर शुभम काळसर्प, नेहा कांबळे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात शिपाई पदावर नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor participates in Maharashtra Day Celebrations of BMC

Mon May 1 , 2023
Mumbai :-Governor Ramesh Bais also participated in the Maharashtra Day Celebrations organized by the Brihan Mumbai Municipal Corporation at Krida Bhavan near Shivaji Park in Mumbai on Sun (1 May). The Governor inspected the Ceremonial Parade and addressed the people of the State on the occasion. The Speech given by the Governor is enclosed. State Chief Minister Eknath Shinde, Guardian […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com