व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण काळाची गरज- मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटच्या नागपूर येथील कन्व्हेन्शन सेंटर तसेच कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन गडकरींच्या हस्ते संपन्न

नागपूर-  व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण ही काळाची गरज असून नागपुरातील  मागास भागातील  गरीब विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण तसेच कौशल्य प्रशिक्षण  देऊन सिम्बॉयसिस विद्यापीठाने नागपूरकरांना अनोखी भेट दिली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज केले, पूर्व नागपुरातील वाठोडा येथील सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या नागपुर कॅम्पस येथील कन्वेंशन सेंटर तसेच प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते .याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ .श. बा .मूजमदार विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते. हे विद्यापीठ स्थापन  होण्याआधी  पूर्व नागपुरातील या जागेवरील अतिक्रमण, डम्पिंग ग्राउंडची तसेच रस्त्याची समस्या तत्कालीन महापौर, आयुक्त आणि आमदार यांनी पाठपुरावा करून दूर केली या विद्यापीठाची संरचना ही सिम्बॉयसिस च्या सगळ्या कॅम्पस पैकी सर्वात सुंदर अशी नागपुरात साकारली आहे असे गडकरी यांनी सांगितलं . सिम्बॉयसिस   कॅम्पस पुढे  साई   – क्रीडा  प्राधिकरण लवकरच स्थापन होणार असून नागपुरातील या भागात आता विकासाला  वेग आला असल्याचं त्यांनी सांगितलं, भांडेवाडी  येथे ग्रीन हायड्रोजनचा प्रकल्प स्थापण्याचा सुद्धा विचार चालू असून  पारडी च्या पुलापासून ते जयप्रकाश नगर पर्यंत इलेक्ट्रिक वर चालणारी केबल बस   आणण्याचा प्रस्ताव आहे असे गडकरी यांनी सांगितलं

सुमारे 950  बैठक क्षमता असलेले कन्व्हेंशन सेंटरमध्ये कॉन्फरन्स हॉल तसेच बैठक कक्ष आहेत .

या उद्घाटन कार्यक्रमाला  सिम्बॉयसिस  विद्यापीठाचे विद्यार्थी, शिक्षक  उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मौलाना अबुल कलाम आझाद बगीचाचे थाटात उद्घाटन 

Mon Mar 28 , 2022
उदघाटन सोहळ्यानंतर पहिल्याच दिवशी रविवारी आझाद बगीचात नागरिकांची मोठी गर्दी चंद्रपूर – चंद्रपूर शहराचे हृदयस्थान असलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद बगीचाचे रूप पालटले असून, भव्यदिव्य, मनमोहक आणि आकर्षक असा बगीचा चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने साकारण्यात आला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा शनिवार, दिनांक २६ मार्च २०२२ रोजी रात्री मोठ्या थाटात पार पडला. उदघाटन लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!