अट्टल वाहन चोरटा नवीन कामठी पोलिसांच्या जाळ्यात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठीता प्र 19 :- नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कामठी गुमथळा मार्गावरील गादा शिवारात अट्टल वाहन चोरट्यास नवीन कामठी पोलिसांनी मोटारसायकल सह अटक करून 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई सोमवारला सायंकाळी सात वाजता सुमारास केली असून अटक आरोपीचे नाव भूपेश परसराम खेटेले वय 34 राहणार पळसगाव, तालुका साकोली, जिल्हा नागपूर हल्ली मुक्काम अजनी कामठी असे आहे. नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास रामनिधी पटेल वय 38 कवाटर नंबर 12/5 मिलिटरी हॉस्पिटल कँटोन्मेंट कामठी यांच्या मालकीची हिरो होंडा मोटरसायकल क्रमांक एमएच 14 एचआर 1924 क्रमांकाची दुचाकी 14 जुलैला आरोपी भूपेश परसराम खेटेले यांनी चोरी करून आजनी शिवारातील आशिष वंजारी यांच्या शेतात राहत होता .दिनांक 18 जुलै रोज सोमवारला गाडीचे नंबर प्लेट बदलवून एमएच 36 जे 1701 असा नंबर करून हिरो होंडा मोटरसायकल ने कामठीवरून गादा मार्गे भंडाऱ्याकडे जात असताना नवीन कामठी पोलीस ठाण्यातील डीबी पोलीस पथक गस्तीवर असताना त्यांनी आरोपी भूपेश परसराम खेटेले यास गाडी थांबवून गाडी संदर्भात चौकशी केली असता त्यांनी बनवाबनवीचे उत्तर देऊन टाळण्याचा प्रयत्न करू लागला पोलिसांनी त्याला गाडीसह अटक करून नवीन कामठी पोलीस स्टेशनला आणून पोलिसी हिसका दाखवताच त्याने हिरो होंडा गाडी चोरी केल्याचे कबूल केले त्यानुसार पोलिसांनी नवीन कामठी पोलीस स्टेशनला कलम 379 नुसार गुन्हा दाखल करून मोटार सायकलसह अटक केली मोटारसायकल ची किंमत 50 हजार रुपये आहे आरोपी भूपेश परसराम खेटेले यास कामठी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने 21 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे त्यामुळे त्याचे जवळून अजून काही वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येणार असल्याचे नवीन कामठीचे ठाणेदार संतोष वैरागडे यांनी सांगितले आहे .वरील कारवाई डीबी पथकातील संदीप सगणे, संदेश शुक्ला ,कमल कनोजिया ,सुरेंद्र शेंडे ,अनिकेत सांगळे ,लवकुश बनोसे आदींनी केली.

Next Post

राज्याच्या प्रगतीसाठी लोकहिताचे निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Wed Jul 20 , 2022
 नवी दिल्ली  :  समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. राज्याच्या उत्कर्षासाठी शासनाने लोकहिताचे महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.   Your browser does not support HTML5 video.             मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी बुधवारी, 20 जुलै 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयात इतर मागास वर्गाच्या (ओबीसी) आरक्षणाबाबत होणाऱ्या सुनावणी संदर्भात वकील, विधीज्ञ आणि तज्ज्ञांची भेट घेऊन सखोल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com