नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेद्वारा प्रस्तुत अर्थसंकल्प नागपूरच्या विकासात भर घालणारा आहे. आधीच गडकरी-फडणवीसच्या जुगलबंदीने नागपुरात विकासकामे जोमात सुरु आहे. त्यात हा अर्थसंकल्प दुग्ध-शर्करा योग असा आहे. नागपूरकराच्या उज्वल भवितव्यासाठी निश्चितच फलदायी ठरणारा असा हा अर्थसंकल्प असल्याचे आमदार कृष्णा खोपडे म्हणाले.
नागपुर होणार लॉजीस्टीक हब, नागपूरसाठी 7000 कोटीच्या वर तरतूद
नागपुरात 1000 कोटीनागपूर मिहानसाठी 100 कोटी, नागपूर मेट्रो साठी 6708 कोटी, तर पूर्व नागपुरातील संताजी आर्ट गॅलरी प्रकल्पासाठी 6 कोटी अशी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार, नागपुरात कृषि सुविधा केंद्र व बुलढाण्यात संत्रा उत्पादक केंद्र उभारण्याची घोषणा नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी निश्चितच लाभदायी ठरणार.
महीला सक्षमीकरणाचा अर्थसंकल्प, खऱ्या अर्थाने महीला दिवस साजरा : आ.कृष्णा खोपडे
राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महिलांना शुभेच्छा देत खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा केला. महिलांना एस.टी.प्रवासात 50 टक्के सूट, लेक लाडकी योजना, आंगणवाडी सेविकांचे मानधनात वाढ, निराधार योजनेत 1500 प्रति महिना, पिडीत महिलांसाठी शक्तीसदन अशा अनेक महिलांसाठी हितकारी अशा योजना या अर्थसंकल्पात प्रस्तुत करण्यात आला.
या व्यतिरिक्त 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लाभदायी ठरणार. शिक्षण सेवकांच्या मानधनात सरासरी 10 हजार वाढ, अशा अनेक घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या. शेतकऱ्यांना केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडून पुन्हा 6 हजार प्रतिवर्ष मिळणार.
एकंदरीत प्रस्तुत अर्थसंकल्प महिला, विद्यार्थी, शेतकरी, निराधार यांच्या हिताचा असून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर मात्र निराशा आणणारा आहे.