हिराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

मुंबई:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

हिराबेन प्रेमळ व मनमिळाऊ वात्सल्यमूर्ती होत्या. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या रुपाने त्यांनी देशाला महान सुपुत्र दिला. त्या कृतार्थ जीवन जगल्या. ईश्वर दिवंगत हिराबेन यांच्या आत्म्याला श्रीचरणी स्थान देवो, ही प्रार्थना करतो व आपल्या शोकसंवेदना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com