नागपूर महानगपालिकाचा अर्थसंकल्प सादर; ‘या’ आहेत नागपुरकरांसाठी मोठ्या घोषणा..

करवाढ नाही, पण उत्पन्न वाढ

आयुक्तांचा दावा, मनपाचा 3336.84 कोटींचा अर्थसंकल्प

नागपूर, ता. २४ – महापालिका आयुक्तांनी आज जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात मालमत्ता करवाढ टाळून नागपूरकरांना दिलासा दिला. सोबतच वेळेत ऑनलाइन देयके भरल्यास व रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा यंत्र, कचऱ्याचे घरीच कंपोस्ट खत तयार केल्यास करात पाच टक्के सवलतही मिळणार आहे. अर्थसंकल्पात नागपूरकरांच्या आरोग्यासाठी ८१ कोटींची तरतूद केली आहे. पुढील तीन वर्षात शहरात ९०० कोटींचे रस्ते तयार करण्याचे नियोजन असून आरोग्य, पायाभूत सुविधांवर भर दिल्याचे दिसत आहे. नागरिकांच्या किरकोळ समस्या सोडविण्यासाठी झोन कार्यालयांना प्रत्येकी अडीच कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी शुक्रवारी २०२३-२४ या वर्षासाठी ३ हजार ३३६ कोटींच्या उत्पन्नाचा संकल्प मांडला. पुढील वर्षात विविध विकासकामे व नियोजित खर्च, असा एकूण ३ हजार २६७ कोटी ६३ लाख रुपये खर्च होईल. पुढील वर्षात आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, पर्यावरणावर भर दिला आहे. नागपूरकरांच्या आरोग्यासाठी ८१ कोटींची तरतूद केली असल्याचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. कोरोनानंतर साथीच्या विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. एच३एन१ चाही प्रभाव वाढत आहे. साथरोगांवर नियंत्रणासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय पाचपावली सूतिकागृहामध्ये सिकलसेलसाठी अनुसंधान केंद्र उभारण्यात येणार असून येथे निःशुल्क सुविधा दिली जाईल. आतापर्यंत २८ प्राथमिक आरोग्य केंद्र होते, ती संख्या ५१ पर्यंत गेली असून येत्या काळात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातून २० मोहल्ला क्लिनिक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आतापर्यंत सिमेंट रस्ता १, २, ३ असे टप्पे झाले. आता सिमेंट रस्ता ४, ५ व ६ असे टप्पे घेण्यात येणार असून प्रत्येकी तीनशे कोटींचे हे टप्पे आहेत. पुढील तीन वर्षांत ९०० कोटी ४० किमीच्या सिमेंट रस्त्यांसाठी खर्च करण्याचे नियोजनही त्यांनी स्पष्ट केले.

अशी झाली तरतूद :-

-संक्रमण प्रादुर्भाव निपटण्यासाठी 5 कोटी

-वायुप्रदुषण टाळण्यासाठी दुभाजक सौंदयींकरणासाठी 20.50 कोटी

-जी-20 व्यतिरीक्त नवीन उद्यान सौंदयींकरणासाठी 10.12 कोटी

-झोपडपट्टयांमध्ये घाणपाणी व्यवस्थापनाकरीता नवीन भूमीगत नाल्यांसाठी 5.50 कोटी

-सीवर लाईनच्या चोकेज समस्या सोडविण्यासाठी 8 कोटी ऐवजी 16 कोटी

-भाडेतत्वावर यंत्रसामुग्री घेण्यासाठी यांत्रिकी विभागाकरीता 37 कोटी

-गड्डीगोदाम येथील कत्तलखान्याच्या आधुनिकीकरणासाठी 4 कोटी

-सांडपाणी व्यवस्थापनातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वीमा योजनेसाठी 55 लाख

-वस्त्यांमधील अंतर्गत रस्ते सुधारणासाठी 40कोटी

-रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी 16 कोटी

-रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी 10कोटी

-झोननिहाय भूमीगत नाल्यांच्या कामासाठी 2.5कोटी प्रत्येकी

-रस्ता रूंदीकरणातील इलेक्ट्रीक स्थानांतरणासाठी 10.50 कोटी

-भिक्षेकरी पुनर्वास प्रकल्पातील कौशल्य विकासासाठी 1.5 कोटी

-बेघर निवारणा योजना, शहर भिक्षामुक्तीसाठी 10 कोटी

-अमृत योजना, स्वच्छ भारत योजनेसाठी नवे पदांतर्गत 20 कोटी

-स्वच्छ भारत योजनेसाठी मनपा वाटा 50कोटी

-जुना भंडारा रोड, अजनी, सोमलवाडा, रामजी पहलवान येथील भूसंपादनासाठी 200 कोटी

-विधानसभा निहाय इंग्रजी शाळांच्या दुरूस्तीसाठी 2 कोटी

-वाचनालय, अभ्यासिका सुदृढीकरणासाठी 8.60 कोटी

-शहरातील नाले दुरूस्तीसाठी 20 कोटी

-पावसाळी नाल्यांसाठी 5 कोटी

-गुंठेवारीअंतर्गत लेआऊटमधील विकासकामासाठी 5 कोटी

-मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी 1 कोटी

-नव्या स्वच्छतागृहाच्या अतिरीक्त मोहिमेअंतर्गत 14 कोटी

-सीमेंट रस्ता टप्पा4,5,6 अंतर्गत 40 किमी रस्त्यांसाठी 900 कोटी

-अग्निशमन विभागाच्या बळकटीकरणासाठी 25 कोटी

-उंच इमारतींच्या सुरक्षेसाठी 72 मीटर हायड्रंट खरेदीसाठी 6 कोटी

-एकात्मिक रस्ते व्यवस्थापनासाठी राज्य सरकारकडे 197 कोटींचा प्रस्ताव

आकडे बोलतात…

– 2022-23 मध्ये 2821.25 कोटी निव्वळ नफा

-2022-23 चे सुधारीत उत्पन्न 2918.49 कोटी

-2022-23 एकूण अंदाजीत खर्च 2916.74 कोटी

-2023-24 मध्ये अंदाजीत उत्पन्न 3336.84 कोटी

-2023-24 एकूण अपेक्षीत खर्च 3267.63 कोटी

खर्चाचा ताळेबंद (कोटीत):-

शिर्ष 2022-23(सुधारीत) 2023-24( प्रस्तावित)

– महसूली खर्च 1704.96 1901.16

-भांडवली खर्च 1027.16 1226.43

– निक्षेप ठेवी खर्च 155.84 121.03

– अग्रीम खर्च 28.76 19.00

-एकूण खर्च 2916.73 3267.63

– 31 मार्चअखेरची शिल्लक 1.75 70.96

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मनपा प्रशासकांनी मांडला ३२६७ कोटींचा अर्थसंकल्प, कुठलीही कर वाढ नाही : नागरिकांच्या सूचनांचा अंतर्भाव

Sat Mar 25 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे प्रशासक आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी २०२३-२४ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प शुक्रवारी (ता.२४) सादर केला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहामध्ये पत्रकार परिषदेत मनपा आयुक्तांनी २०२३-२४ या वर्षाचा ३२६७.६३ कोटींचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाने, राम जोशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलीन खडसे उपस्थित होते. मनपाच्या इतिहासातील सर्वात मोठा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com