मनपा प्रशासकांनी मांडला ३२६७ कोटींचा अर्थसंकल्प, कुठलीही कर वाढ नाही : नागरिकांच्या सूचनांचा अंतर्भाव

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे प्रशासक आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी २०२३-२४ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प शुक्रवारी (ता.२४) सादर केला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहामध्ये पत्रकार परिषदेत मनपा आयुक्तांनी २०२३-२४ या वर्षाचा ३२६७.६३ कोटींचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाने, राम जोशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलीन खडसे उपस्थित होते.

मनपाच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प मांडताना मनपा प्रशासक व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी अर्थसंकल्पात २०२२-२३ या वर्षातील एकूण खर्च २९१६.७४ कोटी नमूद केले. २०२३-२४ या वर्षातील हाती घ्यावयाच्या विकास कामाचे नियोजन करताना त्या कामाची तात्काळ उपयोगीता व गरज आहे त्याकडे विशेष लक्ष देण्यात आले असून विशेष महत्वाचे व तात्काळ हाती घ्यावयाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये २०२३-२४ या वर्षात कुठलीही मालमत्ता कर वाढ नोंदविलेली नाही. याशिवाय पर्यावरणपूरक बाबींचा अवलंब करणा-यांना कर सवलत देण्याची योजना अंतर्गत जे मालमत्ताधारक त्यांच्या घरी रेन वाटर हार्वेस्टिंग, सोलर पॅनल आणि कम्पोस्टिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करणार त्यांना मनपाच्या मालमत्ता करामध्ये विशेष सवलत देत असलेली योजना यावर्षी सुद्धा सुरू राहिल. याशिवाय ऑनलाईन माध्यमातून चालू वर्षाचे मालमत्ता कर भरणा करणा-यांना ५ टक्के सूट देण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागपूर महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून शहराचा अर्थसंकल्प लोकाभिमुख असावा अशी संकल्पना मांडली होती. त्यानुसार त्यांनी नागरिकांनी अर्थसंकल्पासाठी सूचना सुद्धा मागविल्या होत्या. मनपा आयुक्त तथा प्रशासकांना ९७ प्राप्त सूचना अर्थसंकल्पासाठी प्राप्त झाल्या. या सूचनांपैकी जास्तीत जास्त सूचना जनसुविधांच्या दृष्टीने महत्वाच्या असल्याचे लक्षात घेता आयुक्तांनी अर्थसंकल्पात त्या सूचनांनुसार तरतूद केली आहे.

अर्थसंकल्पातील ठळक बाबी व आर्थिक तरतूद

Ø मालकत्ता करामध्ये वाढ नाही, ऑनलाईन सुविधेद्वारे चालू वर्षाचा कर भरणा करणा-यांना ५ टक्के सूट

Ø रेन वाटर हार्वेस्टिंग, सोलर पॅनल आणि होम कम्पोस्टिंग या त्रिसूत्रीचा अंगीकार करणा-यांना मालमत्ता करामध्ये विशेष सवलत सुरू राहणार

Ø संक्रमण रोग रोखण्याकरीता आरोग्य यंत्रणेच्या प्रबळ उपाययोजनांसाठी (लस, औषध, चाचणी) ५ कोटी

Ø सिकलसेल निदान व उपचारासाठी पाचपावली सूतिकागृह येथे सिकलसेल डे केअर सेंटर व अनुसंधान केंद्राची सुरूवात करून सर्व तपासणीसाठी लागणा-या सोयीसुविधा नि:शुल्क देणार

Ø उद्यान, रस्ते दुभाजक सुस्थिती दुरुस्ती (२०.५० Cr. Provision )

Ø नविन बगीचे / चौकांचे सौंदर्यीकरण / २०२३-२०२४ (१०.२२ कोटी)

Ø मोठया आकाराच्या गणपती विसर्जनाकरीता ४ कृत्रिम विसर्जन टँक प्रस्तावित, ४.७५ कोटी

Ø सफाई कामगारांचा विमा (सांडपाणी व्यवस्थापन) – ५५.५० लक्ष

Ø शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी ४० कोटी

Ø रस्त्यांचे डांबरीकरण सुस्थिती २३-२४ (१६.६६ कोटी) रस्त्यावरील खड्डे सुधारणा २३-२४ (१० कोटी)

Ø भूमिगत नाली विस्तार सुस्थिती दुरुस्ती (२४.२० कोटी)

Ø Electric Department Utility Shifting २३-२४ (१०.५० कोटी)

Ø भिक्षेकरी पुर्नवसन – १.५० कोटी, बेघर निवारा देखभाल (१०.०० कोटी) अमृत- २ दक्षिण मल:निस्सारण २०.०० कोटी, अमृत- २ WSWM- ५० कोटी

Ø जमिन भुसंपादन २३-२४ (२००.०० कोटी)

Ø विधान सभा क्षेत्र निहाय सहा इंग्रजी माध्यमाचा शाळा सुरु झाल्या असून इतर शाळांमध्ये (शिवणगाव राणी दुर्गावती, मधुरावजी बोबडे) येथे नविन १२ वर्ग बांधण्यात येणार (२.०० कोटी तरतूद)

Ø प्राथमिक/माध्यमिक शाळा / वाचनालय सुस्थिती दुरुस्ती ८.६० कोटी Provision . शहरातील नाले बांधणे २३-२४ (२०कोटी)

Ø मेकॅनिकल स्विपर – स्वच्छ भारत मिशन मधून पुढील वर्षी ९ खरेदी करणार

Ø गड्डीगोदाम येथील कत्तलखाना अत्याधुनिक करून सुरू करण्यासाठी ४.७५ कोटी

Ø भिक्षेकरी पुनर्वसनासाठी १.५ कोटी

Ø बेघर निवारा केंद्रांसाठी १० कोटी

Ø वाचनालय/अभ्यासिका विकसीत करण्यासाठी ८.६० कोटी

Ø नालेबांधणी २० कोटी, पावसाळी नाल्यांची निर्मिती ५ कोटी

Ø नागपूर सुधार प्रन्यासकडून हस्तांतरीत लेआउटच्या विकासाकरिता ५ कोटी

Ø नागरीकांकडून मागविण्यात आलेल्या सुचना एकूण ९७ आहेत. त्यात सर्वाधिक रस्ते/उद्यान/पावसाळी नाले/गडर लाईन याबाबत असून वरील प्रमाणे Provision आहे. डॉगशेल्टर मधील सुविधा १ कोटीची तरतूद

Ø वृक्ष आच्छादन वाढविण्यासाठी सीएसआर आणि मनपा निधीतून वृक्ष लागवड

Ø जून २०२३ पर्यंत १४४ बसेस ‘आपली बस’च्या ताफ्यात, २०२३-२३ या वर्षात नवीन २५० विद्युत बसेस खरेदी करण्याची तयारी

Ø सिमेंट रोड टप्पा ४, ५ आणि ६ अंतर्गत ४० किमी रस्त्याचे बांधकाम

Ø पाचपावली, गंजीपेठ येथे नवीन अत्याधुनिक फायर स्टेशनसह अग्निशमन जवान निवास गाळ्यांचे निर्माण, २५ कोटी

Ø Hydrolic Ladder खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी ६ कोटीची तरतूद

Ø मनपा स्वच्छता कर्मचा-यांसाठी हक्काचे घर मिळवून देण्यासाठी नवीन योजना

Ø झोपडपट्टी भागात रस्त्यासाठी ५ कोटी

Ø पावसाळी नाले विस्तार २३-२४ (५.६० लक्ष)

Ø स्मार्ट टॉयलेट – पुढील वर्षी १४ टॉयलेट तयार करणार असून पुढील वर्षी रु. १४.५० कोटी स्वच्छ भारत मिशन मधून तरतूद करण्यात आली आहे.

Ø पेट पार्क- पुढील वर्षी सुरु करण्याचा मानस आहे, नविन उद्यान निर्माण करणे या पदामध्ये तरतूद करण्यात आली आहे.

Ø ट्री कव्हर वाढविणे वृक्षारोपन पुढील वर्षी ४० हजार झाडे लावण्यात येणार आहे तरतूद NCAP मधून, गोरेवाडा येथे ६६ एकर जागा विकसीत करण्यात येणार आहे. (ग्रीन व्हॅली संस्थेसोबत), जाफर नगर येथे लोधी गार्डनच्या धर्तीवर अद्यावत नर्सरी तयार करण्यात येणार आहे. नविन बगीचे निर्माण करणे या पदांतंर्गत तरतूद आहे

Ø मेकॅनीकल वर्कशॉप – मॉर्डरायजेशन प्रस्तावित आहे. स्वच्छ भारत मिशन मधून पेडेस्ट्रिशन क्रॉसिंग मार्कींग शहरातील रस्त्यावरती थर्मो प्लास्टीक रोड माकींग, विविध ठिकाणी साईनेजेस उभारणे तथा दुरुस्ती करणे, विविध ठिकाणी पार्कींग प्लेसेस करुन मार्कींग करणे,

Ø लकडगंज उद्यानात Cactus उद्यान, आयुर्वेदिक उद्यान, गोरेवाडा येथे ७० एकर जागेवर अर्बन पार्क तसेच वैशाली नगर, उंटखाना उद्यान इत्यादी उद्यानाचे नुतनीकरण (तसेच नागरीकांकडून प्राप्त निवेदनानुसार उद्याना बाबतीत समस्यांचे निराकरण)

Ø विविध झोपडपट्टयांमध्ये घाण पाण्याचा निचरा होण्यासाठी सिवर लाईन टाकणे.

Ø (नविन भुमिगत नाली निर्माण – २३-२४ (५.५० कोटी)

Ø स्वच्छतेकरीता साधन सामुग्री वरील खर्च (Jetting Machine) २३-२४ (३७.६५ कोटी)

Ø (सध्या ५ Jetting/ Recycling Machines आहेत, २ नविन प्रस्तावित तसेच ५ रॉडींग मशिनस भाडे तत्वावर घेणे प्रस्तावित / १७.३३ कोटी

Ø लो बेड ट्रेलर – ५२ लक्ष, डॉग व्हॅन (१०)- १०९ लक्ष, Animal Carrying Vehicle (२) – ३७ लक्ष, High flow suction ८१ लक्ष, क्रेन ६८ लक्ष, १० Tata ४०७ – १५१ लक्ष, १० Tata Ace ९० लक्ष, ५ Jetting Cum Grabbing Machine – २७५ लक्ष, ८ Suction Cum Jetting Machine ४००० लिटर X २,८००० लिटर X ६ – ६८० लक्ष.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लिहिगावात दिवसाढवळ्या 65 हजार रुपयांची घरफोडी..

Sat Mar 25 , 2023
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 24 : स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव गावातील एका कुलूपबंद घरातून दिवसाढवळ्या 65 हजार रुपयाची घरफोडी केल्याची घटना काल दुपारी 3 दरम्यान उघडकीस आली असून यासंदर्भात फिर्यादी प्रेमदास गजभिये वय 59 वर्षे रा वार्ड क्र 3 लिहिगाव ने कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 454,380 अनव्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com