भारताच्या विकसित शताब्दीची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प – प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

नागपूर :-भारताला आर्थिकदृष्टया बळकट व जगातील तिसरी अर्थव्यवस्था करण्याचा मार्ग प्रशस्त करणारा, अतिशय सकारात्मक असा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. भारताच्या विकसित शताब्दीची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प आहे.

एक्स समाजमाध्यमावर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, नैसर्गिक शेतीसह शेतीच्या उत्पादकतेत वाढ करण्याचे ध्येय, गरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून एक कोटी घरे, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी माफक व्याजावर दहा लाखांचे कर्ज, युवकांना पहिल्या नोकरीत अर्थसाह्य, 3.57 लाखांपर्यंत आयकरातून सूट देत स्टँडर्ड डिडक्शमध्ये सुसूत्रता आणून नोकरदारांना मोठा दिलासा, सर्व राज्य सरकारांना 15 वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज देऊन विकासात्मक योजना चालविण्यास प्रोत्साहन, पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी देशभरात आर्थिक गुंतवणूक, हिंदू, बौद्ध, जैन धर्मस्थळांचा विकास, कँसरचा महागडा उपचार माफक करण्यासाठी औषधं स्वस्त, शिक्षण, कौशल्य विकास व रोजगार वाढीचे लक्ष्य पक्के करण्यासोबतच इलेक्ट्रिक वाहने, लिथीयम बॅटरी, सौर ऊर्जा पॅनलला घसघशीत सवलत देऊन पर्यावरणपूरक अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्याचे उद्दिष्ट निश्चित करणारा अतिशय संतुलित असा आजचा अर्थसंकल्प आहे.

भविष्याबद्दल आशा व आत्मविश्वास यातून प्रतीत होतो. भारताने ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान…’ हा नारा आजवर प्रबळ केला; यापुढे ‘जय अनुसंधान..!!’ हा नारा भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकेल असा दुर्दम्य आत्मविश्वास मिळतो. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्या गरजा, आकांक्षा आणि कल्याण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे… आणि तेच आज अधोरेखित झाले, असेही ते म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चंद्रपूर येथे जिल्हा स्तरीय सिनिअर सेपक टकरा ( मुले व मुली ) निवड चाचणी 2024

Tue Jul 23 , 2024
चंद्रपूर :- महाराष्ट्र सेपक टकरा असोसिएशनच्या पत्रानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सिनिअर मुले व मुली खेळाडूंना कळविण्यात येते कि, ३४वी सिनिअर महाराष्ट्र राज्यस्तरीय सेपक टकरा (मुले व मुली) अजिंक्यपद स्पर्धा 09 ते 11 ऑगस्ट 2024 दरम्यान ठाणे येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धेत चंद्रपूर जिल्हाचा संघ सहभाग करण्याकरिता सेपक टकरा असोसिएशन, चंद्रपूर जिल्ह्याची निवड चाचणी दिनांक 28 जुलै 2024 रोजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com