नागपूर – नागपूर विद्यापीठाच्या पाली व बुद्धीस्ट स्टडीज पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी *बुद्धिस्ट स्टुडंट्स असोसिएशन* च्या माध्यमातून आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ संजय दुधे यांना भेटून विविध समस्यांचे एक निवेदन सादर केले.
या निवेदनात 3 वर्षांपासून रेंगाळत असलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्राच्या वास्तूचे लोकार्पण व्हावे. बौद्ध अध्ययन, डॉ आंबेडकर विचारधारा व डॉ आंबेडकर चेअर विभागातील विभाग प्रमुखांच्या व प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्या. कमी केलेल्या तज्ञ प्राध्यापकांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात यावे. पीएचडी गाईड ची नवीन नियुक्ती करून संख्या वाढवण्यात यावी. विभाग प्रमुखांच्या मर्जीशिवाय बेकायदेशीरपणे नियमबाह्य नियुक्त करण्यात आलेल्या अंशकालीन प्राध्यापकांच्या नियुक्त्या रद्द कराव्या. 

चिवर असलेल्या वादग्रस्त लोकांची कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर नियुक्ती न करणे. ग्रंथपाल व ग्रंथालय अद्यावत करावे. बौद्ध अध्ययन, आंबेडकर विचारधारा व पाली पदव्युत्तर विभागात विद्यापीठाने अवाजवी हस्तक्षेप न करणे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे व अभ्यासक्रमाकडे विशेष लक्ष द्यावे. विद्यापीठाने विभागाला बदनाम करण्यापासून स्वतः वाचवावे. आदी प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
*चर्चे दरम्यान प्र-कुलगुरूंनी विद्यार्थ्यांनी आतंकवाद्या सारखे वागू नये असा शब्द प्रयोग केला असता, विद्यापीठ प्रशासनच विभाग प्रमुखांना डावलून आतंकवाद्या सारखे निर्णय घेऊन विद्यार्थ्यांवर थोपवित असल्याचे विद्यार्थ्यांनी ठासून सांगितल्यावर त्यांनी नरमाईची भूमिका घेतली*.
प्रस्थापित विद्यापीठ प्रशासन जर आपली एकेरी भूमिका सोडणार नसेल व मागण्या मान्य करणार नसेल तर विद्यार्थ्यांना आंदोलना शिवाय पर्याय उरणार नसल्याचा इशारा यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने प्र-कुलगुरू डॉ संजय दुधे यांना देण्यात आला.
शिष्टमंडळात असोसिएशन चे अध्यक्ष भिक्खु महेंद्र कौसल, सचिव उत्तम शेवडे, उपाध्यक्ष नरेश मेश्राम, सदस्य श्यामराव हाडके, सिद्धार्थ फोपरे, मोरेश्वर मंडपे, कैलास घोडेस्वार, सचिन देव, किशोर भैसारे, हिरालाल मेश्राम, बबन मोटघरे आदींचा समावेश होता.