नागपूर :- बसपाचे संस्थापक मान्यवर कांशिराम ह्यांना सम्राट अशोकाचे युग हवे होते. त्या प्रियदर्शी सम्राट अशोकाची भव्य प्रतिमा केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र आदि राज्यातून फिरत फिरत नागपुरात पोहोचताच बसपा नेते उत्तम शेवडे, संदीप मेश्राम, अभिलेश वाहाने, सुमंत गणवीर यांच्या नेतृत्वात माल्यार्पण करून स्वागत करण्यात आले.
कही हम भूल न जाये या बसपा च्या राष्ट्रीय अभियानांतर्गत काल रात्री वर्धा रोडवरील छत्रपती चौकात सम्राट अशोक यांच्या भव्य पुतळ्याचे आगमन होताच बसपाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. सम्राट अशोकाच्या या भव्य पुतळ्याची प्रतिष्ठापना 22 ऑक्टोबर रोजी दिक्षाभूमी येथे झाली आहे.
याप्रसंगी “सम्राट अशोक आपका मिशन अधुरा बीएसपी करेगी पुरा, बीएसपी का सपना है सम्राट अशोकाका राज अपना है, बीएसपी की क्या पहचान नीला झेंडा हाथी निशान” आदि उत्साह वर्धक घोषणा देण्यात आल्या, त्यानंतर अखिल भारतीय भिक्खु संघ महाराष्ट्र प्रदेशचे सल्लागार डॉ भदंत धम्मोदय महास्थवीर यांनी त्रिशरण पंचशील दिले.
यावेळी प्रामुख्याने बसपाचे युवा नेते सदानंद जामगडे, अंकित थुल, प्रकाश फुले, महिपाल सांगोळे, वीरेंद्र कापसे, स्वप्निल ढवळे, अरुण शेवडे, शामराव तिरपुडे, माध्यम गणवीर, शामराव गवई, जिजा गवई, दिव्यांशू कांबळे यांचे सहित मोठ्या संख्येने बसपा पदाधिकारी, कार्यकर्ते व हीतचिंतक उपस्थित होते.
या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की सम्राट अशोक कलिंगच्या युद्धानंतर तथागत बुद्धाच्या धम्माला शरण गेले. त्यामुळे त्यांनी आपल्या हातातले शस्त्र म्हणजे तलवार हे हातातून सोडल्याचे त्या मूर्तीत स्पष्ट दिसते.