नागपूर :- दीक्षाभूमीवर स्मारक समिती, एनएमआरडी, सामाजिक न्याय विभाग व महाराष्ट्र शासनाच्या वतीने दीक्षाभूमी सौंदर्यकरण व विकासाच्या नावाखाली अंडरग्राउंड पार्किंगच्या नावाने होत असलेले बांधकाम जनतेच्या विरोधामुळे व रोषमुळे थांबविण्यात आले. हल्ली त्या जागेला तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने स्मारकाला धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे थांबविण्यात आलेले ते अर्धवट बांधकाम विनाविलंब बुजवुन त्याला धम्मचक्र प्रवर्तन समारोहा पूर्वी समतल करावे या मागणीसाठी आज बसपा च्या शिष्टमंडळाने नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजीव मीना यांची भेट घेऊन एक निवेदन दिले.
शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश बसपाचे कार्यालयीन सचिव व मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार, भदंत डॉ धम्मोदय, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, अनिल मेश्राम, शत्रुघन धनविजय यांचा समावेश होता.
जमीन समतल करण्याची प्रक्रिया आपण कधीपासून सुरू करणार? कारण हे सर्व धम्मचक्र प्रवर्तन पूर्वी प्रक्रिया पार पडायला पाहिजे त्यासाठी आपण कधीपासून त्याची सुरुवात करणार? असे बसपा नेत्यांनी त्यांना विचारले असता सप्टेंबर पर्यंत काम पूर्ण होईल न झाल्यास आपण उपोषणाला बसावे परंतु तशी वेळ येणार नाही असेही महानगर आयुक्त संजय मीना म्हणाले.