आश्रम शाळातील विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासासाठी ब्राईटर माइंडचे प्रशिक्षण – रविंद्र ठाकरे

Ø आश्रम शाळातील 90 विद्यार्थ्यांचा सहभाग

नागपूर :- आश्रम शाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमासोबत बौध्दिक विकासाला चालना देण्यासाठी हार्टफुलनेस फाउंडेशनच्यावतीने ब्राईटर माइंडचे प्रशिक्षण 90 विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले आहे. विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासाला चालना देणारा हा उपक्रम आदिवासी विकास विभागाच्या सर्वच शाळांमध्ये प्राधान्याने राबविण्यात येईल असे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी दिले.

गिरीपेठ येथील आदिवासी विकास भवन येथे आश्रम शाळातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ब्राईटर माइंड प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना ठाकरे बोलत होते.

हार्टफुलनेस फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक श्रीकांत अन्नापूर्व हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या सहआयुक्त बबीता गिरी, माहिती विभागाचे माध्यम समन्वयक अधिकारी अनिल गडेकर, उपायुक्त दशरथ कुळमेथे, हार्टफुल फाउंडेशनच्या प्रशिक्षण प्रमुख नवीन टांक, संजय शर्मा, मनोज जयस्वाल, गिरीराज उईके, कमु मेश्राम, डॉ. मुकुंदराव देशमुख आदी उपस्थित होते.

ब्राईटर माइंड प्रशिक्षणा अंतर्गत 15 वर्षापर्यंतच्या 90 विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना डोळ्यावर पट्टी बांधून शब्द व चित्रांची ओळख, वाचन, विविध प्रकारचे खेळ, वाचन क्षमता वाढविणे आदी उपक्रम राबविण्यात आले. प्रशिक्षणामध्ये 49 विद्यार्थ्याने पूर्ण क्षमता यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे इतरही विद्यार्थ्यांच्या क्षमता वृध्दीसाठी हा उपक्रम नियमित राबविण्याला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. शिक्षकांनी प्रशिक्षणामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. उपक्रम दोन स्तरावर अल्फा व अल्फा प्लस राबविण्यात आला असून विद्यर्थ्यांनी नियमितपणे सराव करावा असे आवाहन रविंद्र ठाकरे यांनी केले.

आश्रम शाळांमध्ये भविष्यवेधी शिक्षण प्रणालीसोबत ब्राईटर माइंड प्रशिक्षण राबविण्यात आल्यामुळे हरदोली येथील आश्रम शाळेत 40 विद्यार्थ्यांची क्षमता वृध्दी झाली असून अशा प्रकारचा उपक्रम नियमित राबविण्याची संकल्पना मुख्याध्यापकाने व्यक्त केली. या प्रशिक्षणामध्ये मुलांच्या दोन्ही बाजुच्या मेंदुचा विकास व्हावा तसेच मुलांमध्ये एकाग्रता वाढविण्यासोबतच अभ्यासाची आवड निर्माण करणे, पाठांतर करणे त्यासोबतच मनन व चिंतनाला प्रोत्साहनाला प्राधान्य देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हा समन्वयक श्रीकांत अन्नापूर्व व प्रशिक्षण प्रमुख नवीन टांक यांनी प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली. दोन्ही डोळ्यावर पट्टी बांधून चित्र, रंग तसेच अक्षर ओळख त्यासाबत वाचन व चित्रकला आदी उपक्रमांचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गाडेघाट येथे हुजूर मरियम अम्मा यांचा वार्षिक उर्स

Sat May 4 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – (दि.७) मे ला शाही संदल भ्रमण आणि (दि.८) मे ला अजीम नाझा यांची कव्वाली कन्हान :- हुजूर मरियम अम्मा साहेबा ( र अ ) यांचा दर्गाह गाडेघाट येथे चारदिवसीय वार्षिक उर्स (दि.६ ते ९ मे २०२४ पर्यंत आयोजित केला आहे. यात ( दि.७) मे ला शाही संदल कन्हान रेल्वे स्टेशन रोड, गहुहिवरा चौक, तारसा रोड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com