गाडेघाट येथे हुजूर मरियम अम्मा यांचा वार्षिक उर्स

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– (दि.७) मे ला शाही संदल भ्रमण आणि (दि.८) मे ला अजीम नाझा यांची कव्वाली

कन्हान :- हुजूर मरियम अम्मा साहेबा ( र अ ) यांचा दर्गाह गाडेघाट येथे चारदिवसीय वार्षिक उर्स (दि.६ ते ९ मे २०२४ पर्यंत आयोजित केला आहे. यात ( दि.७) मे ला शाही संदल कन्हान रेल्वे स्टेशन रोड, गहुहिवरा चौक, तारसा रोड चौक, बाबासाहेबा आंबेडकर चौक, पिपरी भ्रमण करित अम्मा दर्गा गाड़ेघाट येथे पोहचुन विविध धार्मिक कार्यक्रमाने उर्स साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती दर्गा चेयरमेन ताजी तनवी रुद्दीन यांनी दिली आहे.

दरगाह गाडेघाट (जुनिकामठी) येथील सुप्रसिद्ध हुजूर मरियम अम्मा साहेबा (र.अ.) यांचा २०२४ चा वार्षिक उर्स चार दिवसीय कार्यक्रमाने साजरा करण्या त येणार असुन सोमवार (दि.६) मे २०२४ ला मिलाद शरीफ रात्री ९ वाजता, मंगळवार (दि.७) मे ला दुपारी १ वाजता शाही संदल शरीफ, सायंकाळी ६ वाजता परचम कुशाई नंतर चादर पेश करण्यात येईल. बुधवार (दि.८) मे ला सकाळी ९ वाजता कुल शरीफ व रात्री ८ वाजता सुप्रसिध्द कव्वाल अजीम नाझा ची कव्वाली तसेच गुरुवार (दि.९) मे ला मौलाना मो.अहमद नक्श बंदी जुनैदी यांचा तकरीर कार्यक्रम होणार असुन दर रोज लंगर सेवा करण्यात येईल. करिता परिसरातील मोठ्या संख्येने भाविक भक्तानी उपस्थित राहुन या वार्षिक उर्स कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सज्जादानशीन ताजी तब्रेजुद्दीन, सज्जादानशीन ताजी तनवीरूद्दीन व ताजी मुस्तफीजुद्दीन हयांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रविंद्र काळबांडे याची गळफास लावुन आत्महत्या 

Sat May 4 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- खंडाळा (निलज) येथील रविंद्र काळबांडे याने घरी कुणीही नसताना घराचे छताचे लोखंडी पाईपला लुगडयाने गळफास लावुन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसानी मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे. रविंद्र नामदेव काळबांडे वय ३४ वर्षे हा आई वडीला सोबत खंडाळा (निलज) ता. पारशिवनी येथे राहायचा. त्याचे लग्न झाले असुन त्याची पत्नी प्रिती ही मुलगा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com