कामठी रेल्वे स्थानकाहून अल्पवयीन मुलीची पळवणूक..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 2 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे स्थानकाहून वडीलासह स्वगृही जाण्यासाठी कामठी रेल्वे स्टेशन वर आलेल्या एका 17 वर्षोय अल्पवयीन मुलीची पळवणूक झाल्याची घटना काल सकाळी साडे दहा दरम्यान घडली असून यासंदर्भात पीडित फिर्यादी वडिलाने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादवी कलम 363 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी हे आपल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसह कामठी तालुक्यातील भोवरी या गावात मजुरीकामाला आलेले होते परंतु पगार कमी मिळत असल्याने यातील नमूद घटना तारीख वेळी व ठिकाणी फिर्यादी हे आपले अल्पवयीन मुलीसह मूळ गावी जाणे करिता रेल्वे स्टेशन कामठी येथे रेल्वे ची वाट बघत असताना फिर्यादी यांचे मुलीने त्यांना चॉकलेट घेऊन येते असे सांगुण गेली परंतु बराच वेळ होऊन हि ती परत न आल्याने फिर्यादी यांनी तिचा परिसरात सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून अली नाही

तिला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले असावे अशा फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून गुन्हा दाखल करून तपासात घेतला. असून पीडीत मुलीचा शोध सुरु आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जुन्या वैमनस्यातून गावातील ग्राम पंचायत परिचराचा खून

Sun Oct 2 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी  आरोपीने अंगावर चढविली चार चाकी गाडी उपचारा दरम्यान मृत्यू.. आरोपी ने पोलिस स्टेशन मध्ये जाऊन केले आत्मसमर्पण गोंदिया –  जिल्ह्यातील तिरोडा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या दवनीवाडा गावातील ग्राम पंचायत मध्ये असलेल्या परिचर यांच्या अंगावर चार चाकी गाडी चढविल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. मृतक परिचर यशवंत मेंढे वय ५१ वर्ष असुन तो आपले काम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com