जुन्या वैमनस्यातून गावातील ग्राम पंचायत परिचराचा खून

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

आरोपीने अंगावर चढविली चार चाकी गाडी उपचारा दरम्यान मृत्यू..

आरोपी ने पोलिस स्टेशन मध्ये जाऊन केले आत्मसमर्पण

गोंदिया –  जिल्ह्यातील तिरोडा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या दवनीवाडा गावातील ग्राम पंचायत मध्ये असलेल्या परिचर यांच्या अंगावर चार चाकी गाडी चढविल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.

मृतक परिचर यशवंत मेंढे वय ५१ वर्ष असुन तो आपले काम आटोपून घरी जात असतानाच गाम पंचायत गेट समोर आरोपी प्रवीण नेवारे वय 38 वर्षे आपली टाटा सुमो गाडी क्रमांक एम एच ३४ एए ९१४५ ने जोरदार धडक दिली. व गाडी मागे पुढे करून अंगावर चढविल्याने गंभीर जखमी केले. असुन परिचर यशवंत यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णाल गोंदिया येथे दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जुन्या वैमनस्यातून ही घटना झाल्याचे समोर येत आहे. घटनेची माहिती दवनीवाडा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून आरोपी विरुद्ध भादवी कलम ३०७, ३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. असून आरोपीने दवणीवडा पोलिस स्टेशन मध्ये जाऊन आत्मसमर्पण केला आहे. तर पुढील तपास दवणीवडा पोलिस करत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com