संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान पो.स्टे. ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस पाच कि मी अंतरावर मौजा बोरडा (गणेशी) शेत शिवारातील ज्ञानेश्वर मोहने यांच्या शेतातील टिनाच्या शेड मधुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने ५० गावरानी कोंबड्या चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार ज्ञानेश्वर घनश्याम मोहने वय ३९ वर्ष राह. बोरडा (गणेशी) यांची बोरडा शेत शिवारा त दीड एकर शेती असुन शेतात कुक्कुट पालन कर ण्यासाठी टिनाचे शेड बांधले असुन त्यामध्ये पंचायत समिती पारशिवनी येथुन ८४ गावरानी कोंबड्या पाळ ण्यासाठी एप्रिल २०२२ मध्ये घेतल्या होत्या. त्यांचा चारापाणी व देखरेख ज्ञानेश्वर मोहने हे स्वता करीत असुन शुक्रवार (दि.२०) मे ला सकाळी ८ वाजता दर म्यान ज्ञानेश्वर मोहने हे शेतात गेले व कोंबड्यांना चारा पाणी देऊन दुपारी १२ वाजता घरी गेले. तेव्हा गावरा नी ८४ कोंबड्या शेतातील टिनाच्या शेड मध्येच होत्या. काही वेळाने जेवन करून २.३० वाजता शेतातील टिनाच्या शेड मध्ये कोंबड्यांना चारापाणी देण्यासाठी गेले. तेव्हा ज्ञानेश्वर मोहने ला कोंबड्या कमी दिसल्या ने त्यांनी व्यवस्थित पाहनी केली तर ८४ गावरानी कोंबड्या पैकी ३४ कोंबड्या दिसल्या व ५० कोंबड्या न दिसल्याने ज्ञानेश्वर मोहने यांनी शेताचे जवळील लोकांना विचारपुस केली. आणि शोध घेतला तरी मिळुन न आल्याने शुक्रवार (दि.२०) मे ला दुपारी १२ ते २.३० वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने ज्ञानेश्वर मोहने यांच्या शेतातील टिनाच्या शेड मधुन गावरानी ५० कोंबड्या किमत अंदाजे १५,००० रूपया चा मुद्देमाल चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्या दी ज्ञानेश्वर मोहने यांच्या तोंडी तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र. ३१०/२०२२कलम ३७९, भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आरोपीचा शोध घेत आहे.