संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– पंचविस रक्तदात्यांनी केले रक्तदान.
कन्हान :- युवा मित्र परिवार खेडी व जनमैत्री बहुद्दे शिय संस्था खेडी द्वारे खेडी ग्राम पंचायत कार्यालयात डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालया नागपुर शासकिय रक्तपेढीच्या डॉक्टर व चंमुनी २५ रक्तदात्यांचे रक्तदान संकलन करून रक्तदान शिबीर संपन्न केले.
रविवार (दि.१९) मे २०२४ ला सकाळी ९ ते २ वाजता पर्यंत युवा मित्र परिवार खेडी व जनमैत्री बहुद्देशिय संस्था खेडी द्वारे ग्राम पंचायत खेडी कार्यालयात डागा स्मृती शासकिय स्त्री रुग्णालय नागपुर शासकिय रक्तपेढीचा माध्यमातुन भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात जनमैत्री संस्थेचे संस्थापक स्वप्निल चौधरी, श्रीकृष्णा काळे, शुभम गावंडे, विनोद इंगळे, सतिश ठाकरे, अजित हुड, राहुल कोचे, बंटी काळे, किसना इंगळे, दीपक इंगळे, जितेंद्र वैद्य, ईश्वर हुड, तुकेश घरजाळे, दुर्गेश मेश्राम, मयूर वैद्य, राकेश कोचे, चेतन पुंड, रेवनाथ श्रीरामे, सुनिल ठाकरे, चौरू दोनाडकर, राहुल ताकोद, स्वप्निल भगत, शिवराज निमजे आदी खेडी गावातील एकुण २५ रक्त दात्यांनी स्वयंफुर्त रक्तदान केले. जनमैत्री बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक व रक्तदान शिबिराचे आयोजक मा. स्वप्निल भाऊ चौधरी यांनी रक्तदात्यांना खाण्यासाठी केळी, बिस्किट, चाय, फ्रुटी, नास्ता व जेवण आदींची व्यवस्था केली, तसेच सर्व रक्तदात्यांना सन्मान पत्र व पारितोषिक देऊन गौरव करून रक्तदान शिबिर व्यवस्थित यशस्विरित्या संपन्न केले.