संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नवी कामठी भागातील आनंद नगर येथील कोठारी गैस गोदाम ते नागानी सॉ मिल या रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले असून हा कच्चा रस्ता सिमेंट रोड करून दयावा अश्या मागणी चे निवेदन स्थानिक रहिवाश्यानी सोमवारी तहसील कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय लोकशाही दिनी तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार अमर हांडा यांना सोपविले.
भाजपा शहर महामंत्री उज्वल रायबोले यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार अमर हांडा यांनी निवेदन स्विकारले यावेळी नायब तहसीलदार पृथ्वीराज साधनकर , पूरवठा निरीक्षक अर्चना निमजे, साबांवि चे अभियंता एस आर जनबंधु उपस्थित होते.
आनंद नगरात कोठारी गैस गोदाम असून दिवसभर ग्राहकांची ये जा सुरु असते खड़ड्याचा अंदाज न आल्याने अनेक ग्राहक सिलेंडर घेऊन वाहनासह पडतात आनंद नगरातील हा वर्दळीचा रस्ता असून येथे बुद्ध विहार,चर्च, दरगा आणि हनुमान मंदिर देखील आहे.
या बाबत नगर परिषद प्रशासनाला कळवुण आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन नायब तहसीलदार अमर हांडा यांनी शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळात विक्की बोंबले, शंकर चवरे, हितेश तिरपुडे, बालकदास शिंगाडे,बनवारी यादव,गोविंद चौधरी,रविंद्र मरई, रोहित मेश्राम,यादव चौरे, आशिष रामटेके, हर्ष धुर्वे,अभिषेक गणवीर, राजेंद्र सहारे,प्रफुल ऊके,भारत खोब्रागडे, विकास यादव, महेश बावने,नियाज अहमद, नासिर शेख,मोहन निर्मलकर, दिनेश खेडकर, अरविंद चवडे आदींचा समावेश होता.