संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- राज्यातील गोरगरीब बहिणींच्या संसारात मदत व्हावी व महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्या या उद्देशाने राज्याच्या महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपयांची भेट दिली आहे.त्यानुसार लाडक्या बहिणींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने भाजप कामठी शहर तर्फे उद्या रविवार 22 सप्टेंबर ला दुपारी 3 वाजता कामठी येथील अग्रवाल भवन सभागृहात भव्य लाडकी बहीण मेळावा आयोजित केला आहे.
या भव्य लाडली बहीण मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून भाजप प्रदेश अध्यक्ष व विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे तर विशेष पाहुणे म्हणून आमदार टेकचंद सावरकर, भाजप नागपुर ग्रा जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे व प्रमुख उपस्थितीत भाजप नागपुर जिल्हा महामंत्री अनिल निधान, भाजप नागपूर जिल्हा कोषाध्यक्ष अजय अग्रवाल,अजय बोढारे,अनुराधा अमीन,मनीष वाजपेयी, राजेश रंगारी राहतील तसेच प्रमुख वक्ता म्हणून वैशालि चोपडे राहणार आहेत तेव्हा या भव्य लाडकी बहीण मेळाव्यात अधिकाधीक महिलांनी सहभाग दर्शवावा असे आवाहन आयोजक भाजप कामठी शहर च्या वतीने करण्यात आले आहे.