प्रधानमंत्री आवास योजनाला गती दया भाजपाचे निवेदन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी  :- नवी कामठी भागातील प्रभाग 15 आणि 16 मधे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सर्वासाठी घरे प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत असून या योजनेला गती देण्यासाठी जोमाने प्रयत्न करावे अश्या मागणी चे निवेदन नगर परिषद चे प्रशासक श्याम मदनूरकर याना आज दुपारी बुधवारी भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले यांनी सोपविले प्रशासक श्याम मदनूरकर यांच्या अनुपस्थितित उप मुख्याधिकारी नितिन चव्हाण यांनी निवेदन स्विकारले प्रभाग 15 आणि 16 मधे जवळपास 250 नागरिकाना तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पट्टे वाटप करण्यात आले होते.

आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करणाऱ्या 22 पट्टे धारकांना घरकुल बांधुन देण्यात आले परंतु अद्यापही शेकडो नागरिकाना घरकुल चा लाभ मिळाला नाही . गत दोन वर्षापासून कोरोना च्या नावाखाली प्रधानमंत्री आवास योजने चे काम ठप्प आहे असा आरोप निवेदनातून करण्यात आला.

निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात माजी नगरसेवक प्रतिक पडोळे,विक्की बोंबले, जितेंद्र खोबरागडे, बिरजु चहांदे, मोहन निर्मलकर, रविंद्र मरई,दिनेश खेडकर, सुनिल वक्कलकर, अरविंद चवडे, राजेश पाटील, नामदेव बाराहाते, जागेश्वर गोंडाने यांचा समावेश होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्ह्यात मुसळदार पाऊस सुरूच..

Wed Sep 14 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी  जिल्ह्यात येलो अलर्ट मध्ये येत्या दोन दिवस पाऊस  पडण्याची शक्यता; गोंदिया सह दोन तालुक्यात अतिवुष्टी गोंदिया – गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसा परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असुन जिल्ह्यात मुसळदार पाऊस सुरु असुन गोंदिया तालुका सह दोन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तर येत्या दोन दिवस सुद्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण व पाऊस सुरु असल्याचे हवामान खात्याने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com