रामटेक लोकसभा निवडणुकीत कामठी शहर तसेच लगतच्या गावाची धुरा भाजप पदाधिकारी अजय अग्रवाल सांभाळणार- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 26:-येत्या 19 एप्रिल ला रामटेक लोकसभा मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे.या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार राजू पारवे रिंगनात असून यांना विक्रमी मताने निवडुन आणण्यासाठी भाजप महायुतीचा धर्म निष्ठेने पार पाडत जीवाचे रान करून कुठलीही तमा न बाळगता विजय हाच एक संकल्प घेतला आहे.यासाठी रामटेक लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या कामठी शहर तसेच लगतच्या गावाची मुख्य जवाबदारी ही भाजप चे नागपूर जिल्हा कोषाध्यक्ष अजय अग्रवाल सांभाळतील असे मत होळीच्या पूर्वसंध्येला अजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या संवाद बैठकीत व्यक्त केले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी होळी निमित्त कामठी येथील अजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी कामठी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत होळीपूर्व बैठक घेतली.

हि बैठक जवळपास 3 तास चालली असून या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांचे हालचाल व निवडणुकी संबंधित चर्चा केली. दरम्यान नियोजित पद्धतिने अथक मेहनत घेऊन महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना निवडून आणण्याची जवाबदारी स्वीकारा असे आदेशीत केले.याप्रसंगी उपस्थित भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनमोकळे पणाने मनातील गोष्टी बोलून दाखवीत काही किंतु परंतु चा पाढा वाचला यावर बावनकुळे यांनी कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्यामुळे कार्यकर्ता पक्षाप्रति समाधान असणे गरजेचे असते त्यामुळे कार्यकर्त्याला काम करण्याची स्फूर्ती मिळते पक्षात कार्यकर्त्याला मानाचे स्थान कायम आहे असे अपेक्षित समाधानकारक उत्तर दिल्याने सर्वांनी समाधान व्यक्त करीत विजयश्रीचा संकल्प केला.

याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी होळीच्या गुलालासह विजयाचा गुलाल उधळणार असा निश्चय व्यक्त करीत उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्याना होळीच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी नगर परिषद चे पूर्व विरोधी पक्ष नेता लालसिंह यादव, भाजपा शहर अध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट, प्रदेश भाजपा युवा मोर्चा के सचिव कपिल गायधने, शहरचे संपर्क प्रमुख पंकज वर्मा,राजेश खंडेलवाल,विजय कोंडुलवार, विनोद संगेवार, उज्वल रायबोले,नरेश कलसे,राजा यादव,कुणाल सोलंकी, रजत यादव,शानु ग्रावकर,यश कोंडे,दिनेश शरण,शाफिक शेख,यशवंत निखारे,लालू यादव,गोपाल सीरिया, अनिल पिंगळे, अनिल चावला,प्रसन्न राजुरीया ,सुनील पमनानी, राजू पोलकमवार, सहित अनेक कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

होळीच्या दिवशी पोलिसांचा तगडा बंदोबस्त..

Tue Mar 26 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 26:-होळी व धुळीवंदन सणाच्या औचित्यावर कामठी तालुक्यात अनुचित घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात राहून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यावर वक्रदृष्टी ठेवण्यात आली. ..होळी व विशेषता धुळीवंदन च्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी रुटमार्च सुदधा काढला होता.मद्यप्राशन करून दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगाने बेदरकारपणे चालवितात तसेच रोडने रॅश ड्रायव्हिंग,स्टंटबाजी सारख्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights