ऑटो मध्ये दागिन्यासह विसरलेली बॅग मिळवून दिल्याबद्दल महिलेने मानले पोलिसांचे आभार

नागपुर – दि. 30.04.22 रोजी शुभागी  गोस्वामी वय 35 वर्ष रा. रेल्वे कॉटर नरखेड , हे त्यांचा लग्नाचा वाढदिवस असल्याने नरखेड वरून नागपुर येथे 17ः15 वा. चे सुमारास रेल्वेने आले होते. रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर त्यांनी तेथुन घरी जाण्यासाठी सवारी ऑटो घेतले होते. सवारी ऑटोने ते इंदौरा चौक येथे 17ः30 वा. चे सुमारास उतरतांना सदर महिले सोबत असलेली बॅग ती ऑटोमध्येच विसरुन गेली व सवारी इंदौरा, जरीपटका येथे सोडल्यानंतर ऑटो तेथुन निघुन गेला. काही वेळेनंतर वरील महिलेचे लक्षात आले की त्यांचे सोबत असलेली बॅग ते ऑटोमध्येच विसरले आहे व त्या बॅगेत त्यांचे सोन्याचे दागीने नेॅकलेस किं.अं.रु. 36,000/- व लग्नाचा वाढदिवसानिमीत्त घेतलेल्या सोन्याचे लॉकेट किं.अं.रु. 8,000/- असा एकुण रु. 44,000/- आणि त्यांचे वापराची इतर वस्तू असा मुद्देमाल होता. इंदौरा चौकावर ज्या ऑटोने आले होते त्या ऑटोबाबत सहनिषा केली असता ऑटो मिळुण आला नाही. सदर महिला पोलीस स्टेशन जरीपटका येथे आली व घडलेल्या घटनेबाबत माहिती सांगीतली. यावरुन पोलीस स्टेशन जरीपटका येथील वरीष्ठ पोलीस निरीक्षक  संतोष बाकल यांनी पोलीस स्टेशन येथील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना बोलावुन ऑटो चे शोध घेण्याचे आदेशीत केले. पोलीस स्टेशन जरीपटका येथील तपास पथकाने ऑटोचा शोध घेत असता एकुण 34 सी.सी.टी.व्ही. फुटेज ची पाहणी करत ऑटोचा आर. टी. ओ. रजिस्ट्रेशन क्रमांक प्राप्त केले व त्या ऑटो चे धारक मनोहर बळीराम मंडपे, वय – 46 वर्ष यांची माहिती काढुन त्याचा ऑटो धारकाचा शोध घेवुन वरील महिलेद्वारे त्याचे ऑटो मध्ये बॅग विसरल्याचे विचारलेवरुन त्यांनी महिलेचे बॅग ऑटो मध्ये विसरल्याचे सांगीतले व  महीलेने ऑटो मध्ये विसरलेली बॅग आमचे समक्ष आणुन हरज केली. सदर बॅग बाबत ऑटो चालक यांना विचारणा केली असता त्यांनी माहीती दिली की मी बॅग धारक यांची बॅग ऑटो मध्ये विसरल्याचे काही वेळा नंतर लक्षात आल्यावर त्यांना सोडलेल्या ठिकाणी इंदोरा चौक येथे जावुन शोध घेतला असता मिळुन आले नाही. सदर बॅगची पाहणी केली असता त्यांचेशी संपर्क करण्यायोग्य कोणतीही चीज वस्तु मिळुन आली नाही करीता सदरची बॅग ही ज्या परिस्थीती मध्ये होती तशीच माझे सोबत ठेवली असे म्हणत ऑटो चालक मनोहर यांनी बॅग समक्ष आणुन हजर केली. वर नमुद महीला यांनी बॅगची पाहणी केली असता वर नमुद प्रमाणे दागीणे व इतर मुद्देमाल पुर्ववत प्रमाणे असल्याचे सांगीतले. वरुन सदर बॅग त्यात असलेल्या मुद्देमालसह महीलेच्या ताब्यात देण्यात आले. सदर महीला यांना त्यांची हरविलेली बॅग परत मिळल्याने त्यांनी जरीपटका पोलीसांचे व ऑटो चालकाचे आभार व्यक्त केले.
सदरची कारवाई  वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष  बाकल  व पोलीस निरीक्षक(गुन्हे)  गोरख कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख सपोनि. राजकुमार त्रिपाठी, पोहवा दिपक बिंदाणे, नापोशि गजानन निशीतकर, रामचंद्र गजभे, छत्रपाल चौधरी, मनिष मेश्राम, नरेष खांबलकर, अमोल हरणे, अमित चौरे यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला तहसील पोलिसांकडून अटक

Wed May 4 , 2022
नागपुर –  दिनांक 25.03 .22  ते दि. 26.03.22 दरम्यान फिर्यादी हरीश नारायणराव गोन्नाडे, वय 40 वर्ष, रा. लाल ईमली गल्ली धारस्कर रोड ईतवारी पो.स्टे. तहसील हद्दीत आपली टू व्हीलर होंडा अ‍ॅक्टीव्हा 3 जी गाडी नंबर एम.एच.49 /ए.बी. – 8446 ही घटनास्थळी लॉक करून आपले घरी आराम करणे करीता गेले व दूस-या दिवशी गाडी ठेवलेल्या ठीकाणी आले असता त्यांना ठेवलेल्या ठिकाणी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com