अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन करून भाजपातर्फे सुशासन दिन साजरा

नागपूर :- देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आज सोमवार दि. २५ डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले व ‘सुशासन दिवस’ साजरा करण्यात आला.

सुशासन दिन कार्यक्रमाचे विदर्भ समन्वयक भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

यावेळी ते म्हणाले, भारताला विकासाची दिशा दाखविण्यात राज्यशास्त्र व कायद्याचे विद्यार्थी असलेले, पत्रकार व हळव्या मनाचे कवी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी दिशा यांचे मोठे योगदान आहे. अनुसूचित जाती- जमाती प्रवर्गातील पदोन्नती, नोकऱ्यांतील आरक्षण यासाठी त्यांनी कायदेशीर मार्गाने न्याय दिला. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झालेले २६ अलीपूर रोड, नवी दिल्ली येथील तीन एकराच्या विस्तीर्ण परिसरातील घर अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना सर्व अडथळे पार करून १९ कोटी रुपयांमध्ये सरकारद्वारे विकत घेतले. पुढे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या घराच्या ठिकाणी स्मारक निर्मितीचा पुढाकार घेतला. अटल बिहारी वाजपेयी यांनी संविधानाच्या संपूर्ण सन्मानासह देशात सुशासनाची निर्मिती केल्याचेही ऍड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.

यावेळी राजेश संगेवार, अशोक देशमुख, सुरेश बारई, किशोर सायगन, विक्रम डुंभरे, मोसमी वासनिक, सचिन जुगेले, रेखा जुगेले, जगतरामजी जुगेले, नरेश, वंजारी, गीता खोब्रागडे, अनिकेत देशमुख, ऋषभ जुमले, चेतन जुमले, नरेंद्र तिजारे, खुशाल वेलेकर आदी उपस्थित  होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिलांना सक्षमतेची जाणीव करून देणे आवश्यक : कुलगुरू उज्वला चक्रदेव

Mon Dec 25 , 2023
– ग्रामायण सेवा प्रदर्शनात रंगली महिलांची मैफिल – महिलांसाठी समयस्फुर्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन नागपूर :- शहरासह ग्रामीण भागातील महिला सक्षम आहेत. मात्र, त्यांना त्यांच्या सक्षमतेची जाणीव करून देणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी केले. ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने तसेच नागपूर महानगरपालिका आणि पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित पाचवे विदर्भातील वैशिष्टपूर्ण ग्रामायण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com