नागपूर :- राष्ट्रीय कॉन्ट्रॅक्टर लेबर युनियन तर्फे भगवान विश्वकर्मा जयंती निमित्ताने रविवार 17 सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता. रामेश्वरी रिंग रोड पटले एंटरप्राईजेस येथून भव्य बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले असून ही बाईक रॅली रामेश्वरी येथून निघून मानेवाडा, खरबी चौक, वाटोळा, भवानी मंदिर पारडी रोड, मानकापूर या प्रमुख मार्गाने निघून जागोजागी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय कॉन्ट्रॅक्टर लेबर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय पटले यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. पत्रकार परिषदेला टेकचंद रहागंडाले, अजय हिरनखेडे, विनोद अजित, कमलदास, बागेश्वर, उपस्थित होते.