कुस्तीमध्ये विजय शिंदे, कल्याणी मोहारे चॅम्पियन : खासदार क्रीडा महोत्सव

नागपूर :- खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सीनिअर गटात वाशिमचा विजय शिंदे आणि नागपूर ग्रामिणची कल्याणी मोहारे यांनी प्रतिस्पर्धकांना धुळ चारत विजयाची गदा उंचावली. झिंगाबाई टाकळी येथील श्रीराम मंदिर, राठी लेआउट, झेंडा चौक येथे शुक्रवारी (ता.19) रात्री विदर्भ स्तरीय कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली.

सीनिअर पुरूष गटात 74 किलोवरील वजनगटात वाशिमच्या विजयने अमरावतीच्या शोएब अब्दुलला मात देत सुवर्ण पदकावर मोहोर उमटविली. शोएबने रौप्य तर चंद्रपुरच्या अश्विन खनके ने कांस्य पदक पटकाविले. सीनिअर महिला गटात 62 ते 76 या खुल्या किलो वजनगटात नागपूर ग्रामीणच्या कल्याणी मोहारे ने अमरावतीच्या गौरी धोटेला चितपट करीत विजेतेपद पटकावले. गौरीने दुसरे तर चंद्रपुरच्या नंदिनी थापाने तिसरे स्थान प्राप्त केले.

सीनिअर पुरूषांच्या 74 किलो वजनगटात वाशिमचा रवी यदमळकर विजेता ठरला. त्यांनी अमरावतीच्या अभिषेक पोमळेकरला मात दिली. नागपुरचा सागर भोयर कांस्य पदकाचा मानकरी ठरला. महिलांच्या 62 किलो वजनगटात अकोल्याची किरण सुतार ने नागपूरच्या नंदनी साहु ला हरवून विजय मिळविला. तिस-या स्थानासाठी झालेल्या स्पर्धेत चंद्रपुरची सुचिता ठेंगरे विजेती ठरली.

सीनिअर पुरूष – 

53 किलो वजनगट : अतुल चौधरी (भंडारा), प्रणव पोहनकर (अमरावती), भीमराज शिरसाट (अकोला).

57 किलो : ईशाव्य गौर (अमरावती), जगदीश वाणी (वाशीम),शहबाज खान फिरोज खान (चंद्रपुर).

61 किलो : हितेश सोनवाने (चंद्रपुर), हातिम साबरी अली (नागपुर), विनायक चहाण (यवतमाळ).

65 किलो : संजय मौहारे (नागपुर), प्रदीप यादव (अमरावती), सचिन उंडाळ (वाशीम)

70 किलो : गोविंद कपाटे (अमरावती), वैभव गोडघासे (वाशीम), आकाश काळे (यवतमाळ)

74 किलो : रवी यदमळकर (वाशिम), अभिषेक पोमळेकर (अमरावती), सागर भोयर (नागपुर)

74 किलोवरील वजनगट : विजय शिंदे (वाशिम), शोएब अब्दुल(अमरावती), अश्विन खनके (चंद्रपुर)

सीनिअर महिला 

50 किलो वजनगट : अंशिता मनोहरे (नागपुर), अंजली ठाकुर (नागपुर ग्रामीण), सुप्रिया सिंगाडे (भंडारा)

53 किलो : ममता ढेंगे (भंडारा), कोमल गवई (अमरावती), वंशिका कोचे (नागपुर)

55 किलो : राधा खंडारे (अकोला)

57 किलो : क्षितिज़ा कामडे (चंद्रपुर)

59 किलो : तनु जाधव (चंद्रपुर), आयुशी शिंगणे (नागपुर), विनोद गजभिजे (नागपुर)

62 किलो : किरण सुतार (अकोला), नंदनी साहु (नागपुर), सुचिता ठेंगरे (चंद्रपुर)

62 ते 76 किलो वजनगट (खुला) : कल्याणी मोहारे (नागपुर ग्रा.), गौरी धोटे (अमरावती), नंदिनी थापा (चंद्रपुर)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डागा शासकीय रुग्णालयात थैलेसिमिया रुग्णांकरिता ‘मनोधैर्य’ उपक्रम

Sun Jan 21 , 2024
नागपूर :- डागा शासकीय रुग्णालय येथे सिकलसेल, हिमोफिलिया तसेच थैलेसिमिया रुग्णांकरिता वैद्यकीय अधीक्षिक डॉ. सीमा पारवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोधैर्य उपक्रमास 19 जानेवारी रोजी सुरुवात करण्यात आली. रुग्णालयाच्या हिमोफिलिया डे केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या सामाजिक, मानसिक तसेच आर्थिक समस्या समजून घेण्याकरिता मनसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रवीण नवखरे यांच्याद्वारे रुग्ण, डॉक्टर यांच्यामध्ये समूह चर्चेद्वारे रुग्णांच्या मनात उद्भवणाऱ्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. तसेच रुग्ण व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com