ट्रक च्या धडकेत पती,पत्नी गंभीर जख्मी, उपचारार्थ पत्नीचा मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– टेकाडी पुला जवळच्या वळणावरील घटना, पोस्टे ला वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल 

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर बॉयपास टेकाडी पुला जवळील वळणावर अज्ञात ट्रक चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवुन दुचाकीला धडक मारल्याने या अपघातात पती, पत्नी गंभीर जख्मी झाले असुन उपचारा दरम्यान पत्नीचा मृत्यु झाल्याने पोलीसांनी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला.

प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.२२) एप्रिल ला सकाळी १० वाजता दरम्यान पती बाला हिरामन वानखेडे वय ४६ वर्ष आणि पत्नी सुर्वणा वानखेडे वय ४३ वर्ष दोघेही रा. नवरगाव हे हिरो होंडा स्पेंलडर दुचाकी वाहन क्र. डभ ३१ कन ९९२४ ने नागपुर ला घरगुती सामान आणायला गेले होते. दोघेही नागपुर वरुन कन्हान मार्गाने रामटेक ला जात असतांना मध्ये पाऊस आल्याने कांद्री येथे थांबुन रेनकोट घालुन परत रामटेक ला जात असता नागपुर बॉयपास टेकडी पुला जवळील मनसर वळणावर मागुन येणाऱ्या अज्ञात ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन दुचाकी वाहना ला ओवरटेक केले. ट्रकचा मागिल बाजुचा डावी कडचा भाग दुचाकी वाहनाला लागल्याने चालकाचे संतुलन बिघडुन दोघे पती, पत्नी वाहनावरुन रस्त्यावर जोरात पडल्याने पत्नीच्या डोक्याला जबर मार लागला आणि पती ला उजव्या हाताला पायाला मार लागुन फ्रैक्चर झाला. लोकांनी घटनास्थळी धावघेत जख्मींच्या घर च्या लोकांना माहिती देत रूग्णवाहिकेने कामठी येथील खाजगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर न्युराॅन रुग्णालय नागपुर येथे पुढील उपचार कामी भर्ती केले. बाला वानखेडे यांचा उपचार मंगळवार (दि.२३) एप्रिल पासुन प्राईम नर्सिंग होम येथे केला. शुक्रवार (दि.२६) एप्रिल ला बाला वानखेडे यांची पत्नी सुर्वणा वानखेडे चा न्युराॅन रुग्णालय नागपुर येथे उपचार दरम्यान मृत्यु झाला. बाला वानखेडे यांनी रूग्णालयातुन सुटी घेऊन पत्नीचा अंतिम संस्कार कार्यक्रम आटोपुन स्वत:चा घरीच उपचार करून शनिवार (दि. ४) मे ला कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी बाला वानखेडे यांनी तक्रार केल्याने कन्हान पोस्टे ला आरोपी अज्ञात ट्रक चालका विरुद्ध कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ अ भादंवि आर/डब्लु १३४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील चार मंजूर गावे जलजीवन मिशन योजनेपासून अजूनही प्रतीक्षेत

Mon May 6 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत कामठी तालुक्यात एकूण 65 गावात विविध कामांना मंजुरी मिळाली असून येथील काही गावातील कामे पूर्णत्वास आले असून काही गावातील कामे प्रगतीपथावर आहेत मात्र कामठी तालुक्यातील बिना,कोराडी,झरप,चिकना हे चार गावे प्रशासकीय अडचणीत अडकल्याने अजूनही हे चार गावे जलजीवन मिशन च्या कामाच्या प्रतीक्षेत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत एकल गाव योजना अंतर्गत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com