– २ कोटी ६५ लक्ष रुपये निधी मंजूर
नरखेड :- लोकसभा निवडणूकीच्या अगदी तोंडावर मोवाड शहरात तीन वर्षानंतर विकास कामांना गती आली असून ठेकेदारांना सुद्धा चांगले दिवस पाहावयास मिळनार आहे परंतू होत असलेल्या विकास कामाना गालबोट लागता कामा नये निस्कृष्ट दर्जाचे काम होणार नाही कामात गुणवत्ता असावी. शासनाने मंजूर केलेला निधी हा मोवाड शहरात चांगल्या विकास कामांना गती मिळण्यासाठी मिळाला असून. या राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा, आ. चंद्रशेखर बावनकुळे सदस्य विधान परिषद तथा अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या सहकार्याने विविध योजनेतून नगरपरिषद मोवाड येथे २ कोटी ६५ लक्ष रुपये निधी मंजूर केले. या कामाचे भूमिपूजन दिनांक १ मार्च रोजी करण्यात आले. या भूमिपूजन उद्घघाटनाला चरणसिंग ठाकूर सदस्य जिल्हा नियोजन समिती नागपूर ,उकेश चौहान सदस्य जिल्हा नियोजन समिती नागपूर नरेश अरसडे अध्यक्ष काटोल विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, समीर उमप सदस्य जिल्हा परिषद नागपूर,दिलेश ठाकरे अध्यक्ष भाजपा नरखेड तालुका, सुरेश खसारे माजी अध्यक्ष न. प. मोवाड ,रवींद्र वैद्य अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका नरखेड याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चेतन ठोंबरे अध्यक्ष भाजपा मोवाड, दिपक बेले अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोवाड, दिनेश पांडे, रवी माळोदे , वासुदेव बानाईत, डॉ.संजय सोळंकी, निखिल कठाने,उत्तम दारोकर,रहुफ दिवाण, दिलीप बडघरे, योगेश ठणगण व अनेक मान्यवर मोवाडवासी नागरिक उपस्थित होते.