– जिल्हा अध्यक्ष अंकित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न..
नागपूर :- भीम आर्मी भारत एकता मिशन नागपूर जिल्हा तर्फे भीम आर्मी पदाधिकारी नियुक्ती सोहळा आणि आढावा बैठक दि.4 जून रविवार रोजी रविभवन सिव्हिल लाईन नागपूर येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आझाद समाज पार्टी नागपूर जिल्हा अध्यक्ष गणेश चाचेरकर, प्रमुख अतिथी आस्तिक बागडे, विशेष अतिथी भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष अंकित राऊत, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. तसेच सर्व तालुका अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष पंकज जसूतकर, भीम आर्मीचे नरखेड काटोल विधानसभा प्रमुख वसंत पाटील, भीम आर्मी हिंगणा तालुका अध्यक्ष आकाश गजभिये, अमोल साखरकर, कळमेश्वर महिला आघाडी ललिता ढोले, निकिता सिरसीकर,सुरज गणेर, आकाश देशभ्रतार, योगेश कापसे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात ॲड.सचिन निटोनकर यांची पश्चिम नागपूर अध्यक्ष तर अमोल रामटेके यांची वरिष्ठ उपाध्यक्ष नागपूर शहर म्हणून नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रम सोहळ्याला भावेश कडबे, योगेश नारनवरे, नंदा तागडे, शारदा गजबे, सोनू गजबे, संदीप कुमरे, हर्षल जैन, रतन तागडे, उज्वल पाटील, अनिल विसके, गौरव जैन, रोशन गजबे, शशिकला गोडबोले, मंदा गाडगे, आम्रपाली ढोले, हिरा ढोले, अनिल ढोले, दर्शन ढोले, उमेश गोडबोले, निचय ढोले. आदी भीम आर्मी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.