बडा पुलियाखालील कचऱ्याच्या ढिगाला लागली आग

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 7: – कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील एसबीआय बँक जवळील पाच नंबर पुलिया खालील असलेल्या कचऱ्याच्या ढिगाला आग लागल्याची घटना आज सकाळी 11 दरम्यान घडली असता आगीचा धूर हा महामार्गावर पसरला असून भर दिवसा हा रस्ता धुकेमय होत या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.या धुक्यामुळे अमोरा समोर असलेले वाहतूकदार एकमेकांना दिसेना अशी स्थिती होतो.

सदर घटनेची माहिती अग्निशमन पर्यवेक्षक निलेश वाडेकर यांना मिळताच त्वरित घटनास्थळ गाठून अग्निशमन वाहनाच्या सहाय्याने या पुलाखालील कचऱ्याच्या ढिगाला लागलेली आग विझविण्यात यश गाठले व वाहतूक सुरळीत सुरू झाली.दरम्यान नागरिकांनी कचरा हा नाल्यात न फेकता आपल्या घरातील, दुकानातील कचरा संकलन करून नगर परिषद तर्फे येणाऱ्या घंटागाडीत जमा करावे.जेणेकरून उन्हाळ्यात अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही असे आव्हान अग्निशमन पर्यवेक्षक निलेश वाडेकर यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त, तीन चोरट्याना अटक

Sat May 7 , 2022
संदीप कांबळे, कामठी 1 लक्ष 35 हजार 54 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत कामठी ता प्र 7:- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ओमनगर रणाळा येथील एका कुलूपबंद घरातून चोरट्यानी अवैधरित्या घरात शिरून घरातील बेडरूमच्या लाकडी आलमारीत सुरक्षित ठेवलेले 2 लक्ष 80 हजार 800 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना 11 व 12 एप्रिल दरम्यान घडली असता यासंदर्भात फिर्यादी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights