– महाराष्ट्रात तिसरी आघाडी लोकसभा व विधानसभा निवडणुक लढणार – भाऊसाहेब बावने
मुंबई :- महाराष्ट्रात लोकसभा विधानसभा आणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संघटीत आणी एकत्रित लढण्या करीता महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणी संघटना यांना आवाहन करण्यात आले होते.आवाहनाला प्रतिसाद देत तीस राजकीय पक्ष आणी संघटना एकत्र आल्या असुन त्यांनी आघाडी ला संमती दिली आहे.आघाडीची अधिकृत घोषणा करण्या करीता सोमवार 18 डिसेंबर 23 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथील पत्रकार भवनात भारतीय जन आघाडीची बैठक दुपारी 1 वाजता आयोजीत केली आहे.या बैठकीत आघाडीची घोषणा करण्यात येत असुन आगामी लोकसभा आणी विधानसभा निवडणुका या आघाडीच्या वतीने लढविण्यात येणार असल्या बाबत नियोजन करण्यात येणार असल्याची माहीती आघाडीचे महाराष्ट्रातील संयोजक तथा निमंत्रक भाऊसाहेब बावने यांनी सांगीतले आहे.
ही आघाडी स्थापन करण्या करीता आघाडीचे संयोजक राजेंद्र वनारसे तथा निमंत्रक भाऊसाहेब बावने यांची भुमीका महत्वाची असुन या आघाडी करीता बाहुबली जनता पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब साबळे यांच्यासह सर्वच घटक पक्ष आणी संघटना यांनी सुध्दा प्रयत्न केले आहेत या आघाडीत खालील पक्ष आणी संघटना यांनी संमती दर्शविली आहे या मध्ये 1) भारतीय जन सम्राट पार्टी महाराष्ट्र अध्यक्ष प्रतिक बावने (बुलडाणा) 2)राष्ट्रीय संत संदेश पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वनारसे (लातुर) 3)बाहुबली जनता पार्टी अध्यक्ष बाळासाहेब साबळे (वाशिम) 4)गोंडवाणा गणतंत्र पार्टी प्रदेश अध्यक्ष हरिष उईके (नागपुर) 5)जनहित लोकशाही पार्टी अध्यक्ष अशोक अल्हाट (मुंबई) 6) भारत जनाधार पार्टी सुरेंद्र अरोरा (मुंबई) 7) इंडीया अगेन्स्ट करप्शन पुणे अध्यक्ष हेमंत पाटील (पुणे) 8) राष्ट्रीय जनक्रांती पार्टी अध्यक्ष हिंमतराव कोरडे (नाशिक) 9) अखिल भारतीय बंजारा सेना पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.कांतीलाल नाईक 10) ओबीसी एन टी पार्टी अध्यक्ष संजय कोकरे (मुंबई) 11)बळीराजा पार्टी अध्यक्ष बाळासाहेब रास्ते (यवतमाळ) 12) जय विर्दभ पार्टी मुकेश मासुरकर (नागपुर ) 13) मानव हित कल्याण सेवा संस्था राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप कोसरे महाराज 14)भारतीय बहुजन क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मोरसिंगभाई राठोड (ठाणे) 15) भारतीय बंजारा क्रांती दल प्रदेश अध्यक्ष नंदुभाऊ पवार (ठाणे) 16 राष्ट्रीय जनसेवा पार्टी अध्यक्ष अशोकभाऊ खैरनार (मुंबई) 17) समनक जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष संपतजी चव्हाण (बीड) 18) भारतीय जन सन्मान पार्टी प्रदेश अध्यक्ष रमेश जाधव (पनवेल मुंबई) 19) भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ संस्थापक अध्यक्ष अशोक जाधव धनगावकर 20) राष्ट्रीय कामगार संघटना प्रदेश अध्यक्ष गोरख गोपीनाथ गव्हाणे (पुणे) 21) शेतकरी हक्क संघटना अध्यक्ष रामकिसन दुबे (वाशिम) 22) अखिल भटका जोशी समाज सेवा संघ प्रदेश अध्यक्ष समाधान गुऱ्हाळकर (बुलडाणा) 23) प्राउटिस्ट ब्लॉक इंडीया प्रदेश अध्यक्ष विवेक डेहणकर (यवतमाळ) 24)गाडीया लोहार घुमंतु जनजाती महासभा राष्ट्रीय उपाध््यक्ष मंगेश सोळंके (ठाणे) 25) राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल युवा मंच (हिंगोली ) प्रदेश अध्यक्ष विजय करवंदे 26)ओबीसी राजकीय आघाडी संस्थापक अध्यक्ष प्रा.श्रावण देवरे (नाशिक) 27) राष्ट्रीय बंजारा परिषद संस्थापक अध्यक्ष किसनभाऊ राठोड (वाशिम) 28)भटके विमुक्त आदिवासी इतर मागास प्रवर्ग परिषद अध्यक्ष कैलाश भंडलकर (ठाणे) 29) बंजारा पँथर महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष इंजि.रोहिदास पवार (बीड) 30) जगतगुरु राष्ट्रसंत श्री सेवालाल महाराज फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष कुंडलीक पवार ( नाशिक) हे राजकीय पक्ष आणी संघटना आघाडीत आहेत.महाराष्ट्रात सर्व पक्ष व संघटना यांना सोबत घेवुन आगामी निवडणुका लढण्याच्या दृष्टीने रणनीती तयार करण्यात येत आहे.ही आघाडी अधिकाधिक मजबुत व्हावी या करीता पक्ष व संघटना यांनी या आघाडीत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आघाडीचे निमंत्रक तथा भारतीय जन सम्राट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावने यांनी केले आहे.