नागपूर :- भारतरत्न, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त आशा पठाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माहिती संचालक हेमराज बागुल, उपायुक्त चंद्रभान पराते, हरिष भामरे, तहसीलदार डॉ. हंसा मोहने, मराठी भाषा सहायक संचालक हरेश सूर्यवंशी, नायब तहसीलदार आर. के. डिघोळे यांची उपस्थिती होती. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या पुढाकाराने विभागीय आयुक्त कार्यालयात निबंध, काव्यवाचन आणि प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी मराठी भाषा विभाग व विभागीय आयुक्त कार्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विभागीय आयुक्त कार्यालयासह या स्पर्धेत संचालक माहिती कार्यालय, पोलीस विभाग, महसूल, जिल्हा परिषद यासह विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचा-यांनी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
महाराष्ट्र अध्यापक महाविद्यालयाच्या प्रा. शै. रा. गायकवाड, भाषा संचालनालयाच्या स्नेहा भि. पुनसे, वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्रा. पल्लवी विजय कर्वे यांनी परीक्षकांची भूमिका पार पाडली. या स्पर्धेत सहभागी अधिकारी, कर्मचारी यांच्यातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.