नागपूर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपायुक्त (सामान्य प्रशासन) प्रदीप कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.