नागपूर :- बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन मायावती यांच्या भारत बंदच्या आवाहनानुसार नागपुरात जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार यांच्या नेतृत्वात बसपाच्या वतीने जिल्हाभर कडकडीत बंद पाळण्यात आला. शहराच्या सहाही विधानसभा क्षेत्रात बंद यशस्वी झाल्यावर हजारो बसपा कार्यकर्ते संविधान चौकात एकत्र जमले, तिथेही सुप्रीम कोर्ट व केंद्र सरकारच्या विरोधात नारे निदर्शने केली. त्यानंतर नागपूरचे निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खंडे यांना राष्ट्रपतीच्या नावे बसपा ने आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार, प्रदेश महासचिव पृथ्वीराज शेंडे, नागोराव जयकर, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी रंजना ढोरे, जिल्हा कोषाध्यक्ष उमेश मेश्राम, जिल्हा सचिव अभिलेश वाहने, महिला नेत्या सुनंदा नितनवरे आदींचा समावेश होता.