भगवानगड परिसर ४६ गावांसाठीच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम

-जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत फेब्रुवारीमध्ये होणार सुरू– पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

-भगवानगड परिसर ४६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी १९० कोटींची तरतुद

मुंबई, दि. १५ : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत भगवानगड परिसर ४६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात येणार असून फेब्रुवारीमध्ये १९० कोटींच्या या कामाला सुरूवात होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व  स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

            मंत्रालयातील परिषद सभागृह येथे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगड परिसरातील ४६ गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, ॲड.प्रतापराव ढाकणे, भगवानगड परिसर पाणीपुरवठा योजना कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय बडे यावेळी उपस्थित होते.

            पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, भगवानगड परिसरातील ४६ गावांचा या योजनेमध्ये समावेश असून जायकवाडी जलाशय बॅक वॉटर मधून या योजनेचा उद्भव आहे. या योजनेतील ४० गावांचे या योजनेबाबतचे ठराव प्राप्त झाले आहेत. उर्वरीत गावांचे ठराव मंजूर आहेत ते तत्काळ प्राप्त करून त्यावर कार्यवाही करण्यात यावी. योजनेची जागा तसेच उंच टाक्यांच्या जागा ग्रामपंचायतीकडून उपलब्ध करून घेण्यात यावी. पाणी आरक्षणाबाबतचा प्रस्तावावर गतीने काम करावे. योजनेची संकल्पना तसेच आराखडे अंतिम करावेत. या योजनेचे काम दर्जेदार व उत्कृष्ट व्हावे यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

देशी बनावटीचे माऊझर सोबत आरोपी अटक

Wed Dec 15 , 2021
कन्हान – दिनांक 14/12/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान उपविभागात ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबवीत असताना, खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की शिवाजी नगर कन्हान येथील शाहरुख खान नावाचा इसम आपले ताब्यात देशी बनावटीचे लोखंडी माऊझर बाळगून आहे अशी माहिती प्राप्त झाल्या वरून त्याची व त्याचे घराची झडती घेतली असता घर झडती मध्ये एक देशी बनावटीची माऊझर किमती 40000/- रु […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!