मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य – विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे

मुंबई :- राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे काम गतीने सुरू आहे. या कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या कक्षाच्या कार्यपद्धती बाबतची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली आहे.

राज्य शासनामार्फत जनतेला चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध व्हावी यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू आहे. या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना कशा प्रकारे लाभ दिला जातो, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठीची अर्ज प्रक्रिया, तसेच कोणत्या आजारासाठी कशा स्वरूपात आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते, याबाबत या कक्षाचे विशेष कार्य अधिकारी चिवटे यांनी ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरूवार, दि. 25 मे, 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल. ही मुलाखत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येईल.

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

NewsToday24x7

Next Post

ओबीसींच्या कल्याणासाठी आवाज उचलल्याबद्दल मला काँग्रेस नेत्यांनी पक्षातून काढले. - डॉ. आशिष र. देशमुख

Thu May 25 , 2023
नागपूर :- महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्यातर्फे दि. २४ मे २०२३ ला कॉंग्रेसचे डॉ. आशिष र. देशमुख (माजी आमदार, नागपूर, महाराष्ट्र) यांना कॉंग्रेस पक्षातून निष्कासित करण्यात येत असल्याचे पत्र प्राप्त झाले. राहुल गांधी यांच्या एका विधानामुळे संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान होत असेल आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाज दुखावला गेला असेल तर कॉंग्रेसच्या हितासाठी राहुल यानी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com