किटकजन्य आजारापासून सावधानता बाळगा:-वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खानुनी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-किटकजन्य आजार टाळण्यासाठी गप्पी मासे पाळा

कामठी ता प्र 29 :-किटकजन्य आजार म्हणजे डासांसारख्या किटकपासून होणारा आजार आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे या परिस्थितीत ठिकठिकानी पाणी साचत असल्यामुळे डासांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होते त्यामुळे किटकजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही .या आजारावर नियंत्रण साधण्यासाठी नागरीकानी विशेष खबरदारी घेण्याचे आव्हान करीत गप्पी मासे हे डासावर नियंत्रण मिळविण्याचे जैविक साधन असल्याचे मत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारो डॉ शबनम खानुनी यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने यांच्या नेतृत्वात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालयात आयोजित राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत डेंग्यू रोग नियंत्रण व जनजागृती च्या माध्यमातून व्यक्त केले.
क्युलेक्श डास मुळे जॅपनीज एन्सफलायटीस (मेंदूजवर)तसेच सँडफलाय डासांमुळे चण्डिपुरा मेंदूजवर होतो हे रोग 15 वर्षाखालील मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो .या रोगाचे लक्षण बघितल्यास तीव्र स्वरूपाचा ताप, अंगदुखी, डोकेदुखी व उलट्या, हालचालीत लक्षणीय बदल , झटके येणे, बेशुद्ध होणे आदींचा समावेश असून विशेषतः हा रोग 15 वर्षाखालील मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येत असून त्यातील मृत्यूचे प्रमाण 20 ते 40 टक्के असू शकते. तसेच एडिस डासांमुळे डेंगू ताप येतो .
आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आजारांचा प्रसार कसा होतो त्यावरील नियंत्रण, आजारांची लक्षणे, निदान व त्यावरील उपाय याबद्दल जनमानसांनी जागरूकता बाळगावी, हिवताप व डेंगू या आजाराची लक्षणे जवळजवळ सारखेच असतात ज्यात प्रामुख्याने थंडी वाजणे, अंग दुखणे, तिव्रताप येणे तसेच शरीरावर पुरळ येने ही लक्षणे मनुष्य शरीराच्या प्रतिकार शक्तीनुसार कमी अधिक प्रमाणात आढळून येतात ही लक्षणे आढळल्यास त्वरित रक्ताची तपासणी करून घ्यावी तसेच तग्ग्मर्फत रोगाचे अचूक निदान करून औषधोपचार करणे गरजेचे आहे .हिवतापाचा प्रसार हा एनाफिलीस तर डेंग्यूचा प्रसार हा एडिस डासांच्या मादीपासून होतो.हिवताप व डेंगू या आजाराचे डास स्वच्छ व स्थिर पाण्यात अंडी घालतात तर हत्तीरोग आजाराचा डास घाणेरड्या पाण्यात अंडी घालतात असतो.डासांच्या माद्या अंडी देण्याकरिता पोषक म्हणून मानवी रक्ताचे शोषण करतात व त्याद्वारेच मानवाला या तापाची लागण होते . त्यामुळे या आजाराचे नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे आहे यासाठी पावसाच्या साठलेल्या पाण्यामुळे होणारी डासांची उत्पत्ती थांबविणे अधिक प्रभावशाली ठरू शकेल.घरात डासांची निर्मिती थांबविन्याकारिता आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, ज्या दिवशी पाणी साठविण्याची मोठे मोठे , पाण्याच्या टाक्या धुवून स्वछ व कोरड्या कराव्यात .संडासच्या व्हॅट पाईपला जाळ्या बांधाव्यात ज्या पाणीसाठ्यावर आपण कुठलीही प्रक्रिया करू शकत नाही त्या पाण्यात डास अळी भक्षक गप्पी माशांचा वापर करावा .घराच्या भोवताल पाणी साचू देऊ नका, पाण्याच्या उघड्या टाक्या, फुटक्या कुंड्या, टायर यामध्ये पाणी साठू देऊ नये अर्थातच डासांची उत्पत्तीची सर्व माध्यमे नाहीशी करावीत , डास चावूच नये म्हणून प्रतिबंधक मलमांचा वापर करावा .झोपताना मचारदाणीचा वापर करावा तसेच डास व व्यक्ती यांचा संपर्क येणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी असे आव्हान डॉ शबनम खानुनि यांनी केले .याप्रसंगी आरोग्य कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अज्ञात टिप्पर ने मोटारसायकल दिली धडक ; जागीच मुलगा ठार तर वडील व दुसरा मुलगा गंभीर जखमी बसस्थानक मुडीकोटा येथील घटना

Wed Jun 29 , 2022
अमरदिप बडगे गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा बसस्थानक परिसरात अज्ञात टिप्पर ने मोटारसायकला क्रमांक MH 36 P6585 ला धडक दिल्याने वडील मुलगा गंभीर जखमी झाला आहे तर एका मुलाचे अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सायंकाळी 7:30 च्या दरम्यान घडली आहे. मृतक मुलाचे नाव पियुष सुरेश कांबळी वय 12वषे राहणार घाटकुरोडा यांचा जागीच मृत्यू झाला तर वडिल सुरेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com