नागपूर :- फिर्यादी शेख अशरफुल नौशाद अली, वय २१ वर्ष, रा. बालाजी कॉम्प्लेक्स, निकालस मंदीर जवळ, तहसिल, नागपूर हे ईरशाद शेख, यांचे सोन्या-चांदीचे दुकानात, सोन्याचे दागिने पॉलीस करण्याचे काम करीत असुन, दिनांक २१.११.२०२४ चे १३.०० वा. ते १३.१५ वा. चे दरम्यान फिर्यादीचे मालकांनी त्यांना अनुप मंडल, ईतवारी नागपूर, यांचे दुकानातुन दागिने आणण्यास सांगीतले. फिर्यादी हे अनुप मंडल यांचे दुकानातुन दागिने घेवुन पॅन्टचे खिश्यात ठेवुन पायदळ येत असतांना, पोलीस ठाणे तहसिल हद्दीत नरहरी हॉल माकौंग सेंटरचे बाजुला, निकालस मंदीर जवळ, दोन अनोळखी ईसमांनी फिर्यादीस ते सोनार आहेत असे खोटे सांगून फिर्यादीस विश्वासात घेवून त्यांची दुकान बाजुलाच आहे असे सांगुन दागिने चेक करून देतो असे म्हणून फिर्यादी जवळुन दागीने घेवुन फिर्यादीची नजर चुकवुन किंमती १३,१३,१०९/- रू. चे दागिने घेवुन पळुन गेले. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे तहसिल येथे दोन अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३१९(२), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासात तहसिल पोलीसांचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करून त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हा लखनौ उत्तर प्रदेश येथील रहवासी आहे. यावरून त्यांनी आरोपीचा सि.डी.आर लोकेशन काबुन उत्तर प्रदेश येथे जावुन तेथील स्थानीक पोलीसांची मदत घेवुन आरोपीस ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आरोपी क. ०१) सुलतान खान वल्द ईमरान खान, वय २७ वर्ष, रा. घसमंटी मस्जिद, फुलकटोरा जवळ, ठाकुर गंज, लखनौ उत्तर प्रदेश असे सांगीतले. त्यास विचारपूस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा त्याचा साथिदार पाहिजे आरोपी क. २) अनवर हुसैन वल्द मोहम्मद सलीम अली, वय २८ वर्ष, रा. खदरा, लखनौ, उत्तर प्रदेश याचेसह संगणमत करून केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन वरील गुन्हयातील चोरी केलेले ९० ग्रॅम सोन्याची लगडी व एक व्हीवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकुण किंमती अंदाजे ७,१२,०००/- रू चा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी क. १ यास अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, प्रमोद शेवाळे अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) नागपूर शहर, महक स्वामी, पोलीस उप आयुक्त (परि. कं. ३), अनिता मोरे, सहा, पोलीस आयुक्त (कोतवाली विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि. संदीप बुआ, पोनि, प्रकाश राऊत (गुन्हे), पोउपनि, रसुल शेख, पोहवा. संजय शाहु, संदीप गवळी, पोअं. पंकज निकम, पंकज बागडे, संदीप शिरफुले, रोहीदास जाधव, वैभव कुलसंगे, कुणाल कोरचे, महेन्द्र सैलूकर यांनी केली.