उडान खेल प्रोत्साहन योजनेकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ ऑक्टोबर

– ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा

नागपूर :- नागपूर शहरातील प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावा या हेतूने नागपूर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंकरिता ‘उडान खेल प्रोत्साहन योजना’ ही विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ ऑक्टोबर असून जास्तीत जास्त पात्र खेळाडूंनी योजनेसाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

मनपा आयुक्तांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘उडान खेल प्रोत्साहन योजने’च्या माध्यमातून मनपाद्वारे खेळाडूंना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदकप्राप्त खेळाडूंना ५० हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त खेळाडूंना लाभ मिळावा याकरिता मनपाद्वारे शहरातील सर्व क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक देखील बोलविण्यात आली होती. त्यानुसार मनपाकडे अर्ज दाखल केले जात आहेत. जास्तीत जास्त पात्र खेळाडूंना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मनपाद्वारे प्रयत्न सुरू आहेत.

‘उडान खेल प्रोत्साहन योजने’चे अर्ज करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही माध्यमातून सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मनपाच्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. ऑफलाईन माध्यमातून अर्ज भरण्यासाठी ‘तिसरा माळा, क्रीडा व सांस्कृतिक विभाग, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स, नागपूर’ येथे संपर्क साधावा, असे आवाहन क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांनी केले आहे.

‘उडान खेल प्रोत्साहन’ योजनेतील लाभ

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जसे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, वर्ल्ड कप दर दोन वर्षांनी आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा / एशियन चॅम्पियनशिप या स्पर्धांमधील पदक विजेत्या खेळाडूंना २,००,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या खेळाडूंना १,००,००० रुपये तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना १,००,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या खेळाडूंना २१ हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे. याशिवाय वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा व कनिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धा तसेच केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण विभागाद्वारे मान्यता प्राप्त क्रीडा प्रकार जसे, ऑलिम्पिक क्रीडा प्रकार/आशियाई क्रीडा प्रकार/राष्ट्रकुल क्रीडा प्रकार या स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना ५०,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल.

या स्पर्धांचा समावेश

ऑलिम्पिक स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, शालेय आशियाई/जागतिक स्पर्धा, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, एशियन गेम्स, युथ ऑलिम्पिक, पॅरा एशियन स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, ज्युनिअर विश्व अजिंक्यपद स्पर्धा, ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप, वर्ल्ड कप, राष्ट्रीय स्पर्धा (नॅशनल गेम्स), ऑलिम्पिक क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय वरिष्ठ व कनिष्ठ स्पर्धा

असे करा ऑनलाईन अर्ज

‘उडान खेल प्रोत्साहन’ योजनेकरिता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीपैकी कोणत्याही माध्यमातून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दोन्ही अर्जाचे नमूने मनपाच्या www.nmcnagpur.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. संकेतस्थळावर उडान खेल प्रोत्साहन योजना 2024-25 यावर क्लिक करून ऑफलाईन अर्ज डाउनलोड करावा किंवा ऑनलाईन माध्यमातून अर्ज भरता येईल. ऑनलाईन अर्जामध्ये अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो, जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खात्याचा रद्द केल्याची खूण असलेला धनादेश, खेळाडूच्या गत तीन वर्षातील कामगिरीचा तपशील, खेळाडूचे हमीपत्र हे अपलोड करणे अनिवार्य आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपा कर्मचाऱ्यांनी मानले आयुक्तांचे आभार

Wed Oct 2 , 2024
– वाहतूक व महागाई भत्ता थकबाकी आणि पदोन्नतीबाबत निर्णयाचे केले स्वागत नागपूर :- नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता आणि महागाई भत्त्याची थकबाकी तसेच पदोन्नती बाबत घेतलेल्या सकारात्मक निर्णयाकरिता मनपा कर्मचाऱ्यांनी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे आभार मानले. मनपाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सहायक आयुक्त  श्याम कापसे, मनपा आयुक्तांचे स्वीय सहायक प्रमोद हिवसे, जितेश धकाते, मुकेश मोरे यांनी मनपा आयुक्तांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com