१५ जुलैपासुन ” सुंदर माझे उद्यान व ओपन स्पेस ” स्पर्धा  

– स्पर्धेत ५२ हुन अधिक संघ होणार सहभागी

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकच लक्ष शहर स्वच्छ मोहीमेअंतर्गत शहरातील नागरिकांचे आपल्या शहराच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणात योगदान असावे या दृष्टीने ” सुंदर माझे उद्यान ” व ” सुदंर माझी ओपन स्पेस ” या २ स्वतंत्र स्पर्धा १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. स्पर्धेस मोठा प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत ५२ संघानी भाग घेण्याची तयारी दर्शविली असुन १३ जुलै या अंतिम तारखेपर्यंत संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

” माझ्या शहरासाठी माझे योगदान ” या थीमवर ही वार्डस्तरीय स्पर्धा होणार असुन उद्यान समिती,ओपन स्पेस विकास समिती,एनजीओ, स्वयंसेवी संस्था,सामाजीक संस्था,युवक/युवती मंडळे इत्यादी सर्वांना यात सहभागी होता येणार असुन स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्यास काही स्थळ मनपातर्फे देण्यात येणार असुन याव्यतिरिक्त इतर स्थळ जसे शहरातील मोकळ्या जागा,बगीचा, सार्वजनिक ठिकाणे या जागा निवडण्याची मुभा स्पर्धक गटांना राहणार आहे. स्वच्छता व सौंदर्यीकरणात खाजगी जागा घेता येणार नसुन केवळ सार्वजनिक स्थळ अथवा शासकीय जागा असणे अपेक्षित आहे.

स्पर्धेत शहरातील उद्यान,बगीचे,मोकळी जागा (ओपन स्पेस ) यांची स्वच्छता,सौंदर्यीकरण व वृक्षारोपण करण्याचे उपक्रम राबविले जाणार आहे.सदर स्पर्धेत नागरिकांना गट बनवुन सहभागी होता येणार असुन प्रत्येक गटामध्ये कमीत कमी २५ सदस्य असणे आवश्यक आहे. सौंदर्यीकरण करण्यास मनपा मार्फत झाडे व पेंटिंग कलर (मर्यादित) पुरविण्यात येणार असुन इतर काही साहित्याची आवश्यकता असल्यास जसे सुरक्षा साधने इत्यादी मात्र त्या स्पर्धक गटाला स्वतः करावी लागणार आहे. स्पर्धेसाठी गुणांकन पद्धत निश्चित करण्यात आली असुन १५ दिवसाची सरासरी उपस्थिती तसेच कामाच्या तासांवर त्रयस्थ निरीक्षकांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे.स्पर्धेत नागरिकांनी आपल्या गटासह सहभागी होऊन आपल्या शहराच्या सौंदर्यीकरणात योगदान देण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

संपर्क – स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख १० जुलै असुन स्पर्धेत भाग घेण्यास साक्षी कार्लेकर ८३२९१६९७४३, जितेश मुसनवार ८६६८७०८४३५ या क्रमांकावर अथवा मनपा उद्यान विभागात संपर्क साधुन अधिक माहिती घेता येईल. तसेच मनपाच्या फेसबुक पेजवर उपलब्ध असलेल्या गुगल लिंक द्वारेही स्पर्धेत भाग घेता येईल.

बक्षिसे –  

प्रथम पारितोषिक – १ लक्ष, ट्रॉफी व त्या वार्डासाठी ११ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे

द्वितीय पारितोषिक – ७१ हजार,ट्रॉफी व त्या वार्डासाठी १५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे

तृतीय पारितोषिक – ५१ हजार, ट्रॉफी व त्या वार्डासाठी १० लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे

प्रोत्साहनपर – ३ लक्ष रुपयांची ५ बक्षिसे

गुणांसाठी निकष : स्पर्धेत गुण प्राप्त करण्यास पर्यावरण पुरक वृक्षारोपण,टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु बनविणे, उद्यान /ओपन स्पेस विकास समितीची स्थापना व कार्ये,सार्वजनिक स्थळ/उद्यानाचे सौंदर्यीकरण,लोकसहभाग,आरोग्यदायी उपक्रम,ओपन स्पेस/ बगिच्याची देखभाल,परिसराची स्वच्छता,केलेल्या कामाची प्रचार प्रसिद्धी,३ आर तत्वांचा वापर,जागेचे आरेखन करणे असे विविध निकष आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्‍वावर घेण्याबाबत काढलेले परिपत्रक रद्द करा - आमदार सुधाकर अडबाले

Tue Jul 11 , 2023
– सुशिक्षीत बेरोजगारांना संधी देण्याबाबत शिक्षक मंत्री, आयुक्तांना निवेदन नागपूर :- जिल्‍हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्‍वावर तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात नियुक्‍ती करण्याबाबत काढलेले परिपत्रक रद्द करून सुशिक्षीत बेरोजगारांची नियुक्‍ती करावी. तसेच अनेक जिल्‍हा परिषद शाळेमध्ये घड्याळी तासिका तत्‍वावर कार्यरत सुशिक्षीत बेरोजगारांचे या रिक्‍त पदांवर समायोजन करावे, अशी मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण मंत्री दीपक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!