बॅटरी चोरी करणारे आरोपी नागपूर ग्रामीण पोलीसांच्या जाळयात

नागपूर :- दिनांक २१/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील पथक रामटेक उपविभागात पोस्टे. पारशिवनी हद्दीत पेट्रोलींग करीत असता गोपनीय खबर मिळाली कि, पालोरा शिवारात ३ इसम विना क्रमांकाच्या मोटरसायकलवर ट्रॅक्टरची स्टॉप लिंग पट्टी घेऊन जात आहे. या खबरे वरून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करून नाव गाव विचारले असता सदर तिन्ही इसम हे विधिसंघर्ष ग्रस्त बालक असल्याचे समजले त्यांना सदर पट्टीबाबत विचारपूस केली असता उडवा उडवीचे उत्तर दिल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी करंभाड शिवारातून बॅटरी, सोनेगाव तसेच टाऊन येथून ३ हायड्रॉलिक पट्ट्या, रॉड, स्टोपलिंग तसेच पीपला डाक बंगला शिवारातून १ बॅटरी चोरी करून विक्री केल्याचे सांगीतले. आरोपी नामे – सत्यम सुरेंद्र ठाकूर वय ३४ वर्ष रा. खापरखेडा त. सावनेर (कबाडी दुकानदार) यास चोरी केलेले लोखंडी ट्रॅक्टरच्या हायड्रोलोंक पट्टया विक्री केल्याचे सांगितले. त्यांचे ताब्यातून १) ५ बॅटरी किंमती २५०००/- रू. २) ३ हायड्रॉलिक पट्टट्ट्या, रॉड, स्टोपलिंग २८५००/- रू. ३) विना क्रमांकाची हिरो कंपनीची सी डी डॉन मोटरसायकल किंमती १७०००/- रू. असा एकूण ७०,५००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्त मुद्देमाल व आरोपी पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलीस ठाणे पारशिवनी यांचे ताब्यात देण्यात आले.

उघडकीस आणलेले गुन्हे

१) अप क्र. ३/२४ कलम ३७९ भादंवी

२) अप. क्र. ८८/२४ कलम ३७९ भादंवी

३) अप. क्र. ९६/२४ कलम ३७९ भादंवी

४) पो. स्टे खापरखेडा अप. क्र. १७०/२४ कलम ३७९ भादंवि.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेलकी, पोलीस हवालदार रोशन काळे, नितेश पीपरोदे, उमेश फुलबेल, शंकर मडावी, पोलीस नायक वीरेंद्र नरड, विपीन गायधने चालक पोहवा अमोल कुथे स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पो.स्टे काटोल हद्‌दीतील अवैधरित्या मोहाफुल गावठी दारू काढणाऱ्या इसमांवर कायदेशिर कार्यवाही

Tue Mar 26 , 2024
काटोल :- दि. २२/०३/२०२४ रोजी सकाळी ०६/०० वा. पोलीस स्टेशन काटोल येथील पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम सोबत, सहायक पोलीस निरीक्षक नागवे, पोलीस हवालदार लखन महाजन, पोलीस नाईक प्रवीण पवार, रणजीत रोकडे, विकास वाईकर, गुलाब भालसागर, रमेश काकड, वसंता नागरे, अस्मिता गायकवाड, सविता आहाके, असा पोलीस ठाणे काटोल येथील पोलीस स्टाफ सोबत घेऊन पोलीस ठाणे काटोल अंतर्गत येणाऱ्या मौजा डोंगरगाव पारधी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com