संदीप कांबळे, कामठी
-मानधन विलंबाने न देता महिन्याच्या पाच तारखेपर्यंत अदा करावे
कामठी ता प्र 27:-दिव्यांग, विधवा , परीतक्त्या ,घटस्फोटित तसेच 65 वर्षेवरील निराधारांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्याना मानधन दिले जाते.प्रचंड वाढलेल्या महागाईमुळे सध्या निराधारांना मिळणारे हे एक हजार रुपये मानधन अतिशय तुटपुंजे आहे.या मिळनाऱ्या मानधनात पोटाची खळगी भरणे अतिशय कठीण आहे तेव्हा शासनाने संजय गांधी निराधार योजने अंतर्गत मिळणाऱ्या मानधनात वाढ करावे तसेच हे मानधन प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेच्या आत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी अशी मागणी समाजसेवक उदासभाऊ बन्सोड यांनी केले आहे.
काही राज्यात निराधाराना महाराष्ट्र राज्यांपेक्षा जास्त मानधन मिळते तसेच ओडिशा राज्यात निराधरांना तीन हजार रुपये मानधन मिळते पन महाराष्ट्रातच निराधरांना केवळ एक हजार रुपये मानधन का देण्यात येते?असा ही सवाल उदास बन्सोड यांनी केला आहे.समान नागरी कायदा सर्वत्र लागू आहे त्यानुसार इतर राज्यात जसे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्याना मानधन वाढून मिळते त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करावे .