बँकांनी खरीप पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट 15 जूनपर्यंत पूर्ण करावे – डॉ.पंकज आशिया

– खरीप पिककर्ज वाटपाचा आढावा

यवतमाळ :- खरीप हंगामात शेतीसाठी शेतकऱ्यांना पिककर्जाची आवश्यक्ता असते. जिल्ह्यातील सर्व बॅकांना व त्यांच्या शाखांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे. बॅंकांनी आपले वाटपाचे उद्दिष्ट दि.15 जूपपर्यंत पुर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांकडून खरीप पिककर्ज वाटपाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. सुरुवातीस जिल्हा अग्रणी प्रबंधक अमर गजभिये यांनी बॅंकांना या वर्षाच्या पिककर्जाचे दि.31 मे पर्यंत प्राप्त उद्दिष्ट व साध्य याची माहिती दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकनिहाय पिककर्ज वाटपाचा आढावा घेतला. त्यात विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने 132 कोटीचे पिक कर्ज वाटप केले असून ते दिलेल्या खरीप लक्षांकाच्या 82 टक्के आहे. या उत्कृष्ट वाटपासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी या बॅंकेचे कौतूक केले.

काही खाजगी बँकाच्या कर्ज वाटपाच्या कामगिरीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली तसेच त्यांना दिलेले लक्षांक पूर्ण करण्यासाठी कृती आढावा तयार करण्याचा सूचना केल्या. सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या कामगिरीचा आढावा घेताना बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडिअन ओव्हरसीज बँक तसेच पंजाब नॅशनल बँकेला कामगिरी सुधारणाच्या सूचना दिल्या व सर्व बँकांना दिलेले लक्षांक 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

आढावा बैठकीत यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तरलतेच्या कमतरतेमुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना पिक कर्ज घेण्यास येणाऱ्या अडचणीचा विषय जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मांडला. त्यावर सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक यांनी पात्र शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज पुरवठा करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व खाजगी बँका यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यासाठी सहकार विभागाद्वारे पात्र शेतकऱ्यांची गावनिहाय यादी जिल्हा अग्रणी बँकेमार्फत जिल्ह्यातील संबंधित बँक समन्वयकांकडे पुढील कार्यवाहीसाठी देण्यात येईल.

जिल्हाधिकारी यांनी शासनाद्वारे जिल्ह्यातील १६ महसूल मंडळातील दुष्काळग्रस्त गावातील पात्र शेतकऱ्यांचे पिक कर्ज पुनर्गठनास संमती देणाऱ्या शेतकऱ्याचे पिक कर्ज पुनर्गठन तातडीने करण्याचे निर्देश सर्व बँकांना दिलेत. बैठकीला अग्रणी बँक प्रबंधक अमर गजभिये, नाबार्डचे डीडीम दिपक पेंदाम, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे तसेच बॅंकाचे अधिकारी योगेश निलखान, अविनाश महाजन, राजेश कुमार, प्रतीक कुमार, पवन हेमनानी व इतर विविध बँकांचे जिल्हा समन्वयक बैठकीला हजर होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जागतिक सायकल दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

Thu Jun 6 , 2024
यवतमाळ :- जागतिक सायकल दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व क्रीडा भारती सायकलिंग ग्रुपच्या संयुक्त विद्यमानाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचे उद्घाटन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शर्मा यांनी केले. उद्घाटनप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव के.ए. नहार, क्रिडा भारती सायकलिंग ग्रुपचे अध्यक्ष दिलीप राखे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून अभ्यंकर कन्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com