बाळशास्त्री जांभेकर अर्धपुतळ्याचे शुक्रवारी पत्रकारभवनात अनावरण

नागपूर :-मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा अर्धपुतळा येत्या मराठी पत्रकारदिनी, शुक्रवार, 6 जानेवारीला दुपारी 3 वाजता टिळक पत्रकार भवनात स्थापित केला जाणार आहे.

टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ पत्रकार ल. त्र्यं. जोशी यांच्या हस्ते अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात येईल.

या कार्यक्रमाला पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि ट्रस्टचे सरचिटणीस शिरीष बोरकर, प्रेस क्लबचे सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी केले आहे.

वऱ्हाडमधील ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक देशोन्नतीच्या बुलढाणा आवृत्तीचे संपादक राजेश राजोरे यांनी ब्राॅन्झचा हा अर्धपुतळा नागपूर श्रमिक पत्रकार संघाला भेट दिला आहे. तसेच वाशीम, संग्रामपूर आणि देऊळगावराजा येथील पत्रकार संघांनाही त्यांनी असाच अर्धपुतळा भेट दिला.

बाळशास्त्रींच्या ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राचा स्थापनादिन (6 जानेवारी 1832) मराठी पत्रकारदिन म्हणून साजरा केला जातो. बाळशास्त्रींच्या नावाने सेवानिवृत्त पत्रकारांना दरमहा सन्माननिधी देण्याची योजनाही महाराष्ट्र सरकारने 2019 पासून सुरू केली आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अजित पवारांचे समर्थन करणाऱ्या सामनाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव लिहिण्याचा अधिकार नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

Wed Jan 4 , 2023
मुंबई :- छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असे म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे समर्थन सामनाने केले. मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्या सामनात हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव लिहिण्याचा अधिकार नाही. अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पालघर येथे केली. पालघर जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासात असताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!