हिंदु हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उद्घाटन

खासदार अशोक नेते व आमदार डॉ.देवराव होळी यांची उपस्थिती

गडचिरोली :- जिल्हयामध्ये 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभ हस्ते सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत हिंदु हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा (नागरी आरोग्य वर्धिनी केन्द्र) ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. या धरतीवर गडचिरोली जिल्ह्यांमध्ये हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उद्घाटन खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, राजेन्द्र भुयार अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.अनिल रुडे जिल्हा शल्यचिकित्सक, गडचिरोली यांचे उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाकरीता सुर्यकान्त पिदुरकर, मुख्याधिकारी नगर परिषद गडचिरोली, योगीता पिपरे माजी नगराध्यक्ष, डॉ.स्वप्नील बेले, डॉ.सचिन हेमके, डॉ. सुनिल मडावी, डॉ.विनोद मशाखेत्री, डॉ. बागराज धुर्वे, डॉ. रुपेश पेंदाम, डॉ. सिमा गेडाम, डॉ. राहुल थिगळे व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी व बंहुसंख्या नागरीक उपस्थित होते.

हिंदु हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नागरी आरोग्य वर्धिनी केन्द्रांत मिळणा-या आरोग्य सेवेचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन संजय मिणा, जिल्हाधिकारी गडचिरोली तसेच कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.

शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागापासून तसेच झोपडपट्टीवस्ती पासून नागरी प्राथमिक आरोग्य केन्द्राचे अंतर जास्त असल्यामुळे व कामकाजाच्या वेळेमुळे काही झोपडपट्ट्या व झोपडपट्टी सदृश भागातील जनता आरोग्य सेवेपासुन वंचित राहत आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यात 50 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास आहे. शहरी भागातील जनसामान्य, गोरगरीब झोपडपट्टी भागात राहणा-या नागरीकांना गुणवतापुर्ण आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी, विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियत्रंण करण्यासाठी, सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करुन संपूर्ण समाजाचा आरोग्य निर्देशांक वाढविणे व गरजु रुग्णांना आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने शहरी भागातील एकुण लोसंख्येपैकी साधारणता 12,000 ते 20,000 लोकसंख्येसाठी एका याप्रमाणे सपुर्ण महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे. ही नागरी आरोग्य वर्धिनी केन्द्र 15 वा वित्त आयोग अंतर्गत सुरु करण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्हयाकरीता एकुण 15 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नागरी आरोग्य वर्धिनी केन्द्र मंजुर असून पहिल्या टप्प्यात जिल्हयातील कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली असे एकुण 4 नागरी आरोग्य वर्धिनी केन्द्र सुरु करण्यांत आले. उर्वरीत 11 नागरी आरोग्य वर्धिनी केन्द्र लवकरच सुरु करण्याची प्रक्रिया चालु आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही नागरी आरोग्य वर्धिनी केन्द्र मध्ये पुढिल प्रमाणे आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यांत येत आहे. बाहय रुग्ण सेवा (वेळ दुपारी 2.00 ते रात्री 10.00) मोफत औषधी, मोफत तपासणी, टेलीकन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण तसेच या केन्द्रांमध्ये उपरोक्त सेवांच्या व्यतिरिक्त याही सेवा उपलब्ध करुन दिल्या जातील. महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाहय यंत्राणेदवारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा,आवश्यकतेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा.

रुग्ण विभागातील पुढिल विशेषज्ञ संदर्भ सेवा विशेषज्ञामार्फत दिल्या जातील. भिषक (फिजीशियन) स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ , नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, सदर तज्ञ सेवा हया सायंकाळी 5.00 ते 9.00 वाजेपर्यत उपलब्ध करुन देण्यांत येतील, जेणे करुन झोपडपट्टी भागातील मजुर कामावरुन आल्यानंतर या सेवांचा लाभ घेतील आवयकतेनुसार अतिरिक्त सेवा पुरविण्यात येतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

Tue May 2 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवार ता.2) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे परवानगीशीवाय बेकायदेशीर रोडवर शेडचे बांधकाम केल्याबद्दल श्री सदानंद पाटील, सुरज सोसायटी,‍ मनिष नगर येथे कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.ही कारवाई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com