– खेळाडूंच्या मातांचा वीर जिजामाता पुरस्काराने सन्मान
नागपूर :- जिजाऊंनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले. त्याचप्रमाणे विपरीत परिस्थितीत मुलांना खेळाडू म्हणून घडविल्याने वीर जिजामाता पुरस्कार देऊन मातांचा सन्मान होत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सव आयोजन समिती सदस्य डॉ. कल्पना पांडे यांनी केले. क्रीडा भारती नागपूर महानगर, भारतीय खेळ प्राधिकरणाचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या वतीने ‘वीर जिजामाता पुरस्कार सोहळा’ शनिवार, दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन करताना डॉ. पांडे बोलत होत्या.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्रीडा परिसरातील व्यवसाय प्रबंधन विभागाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा भारतीचे राष्ट्रीय सहमंत्री प्रसन्न हरदास हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सव आयोजन समिती सदस्य डॉ. कल्पना पांडे, भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय संघटन मंत्री डॉ. मनीषा कोठेकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सव आयोजन समिती सदस्य डॉ. संतोष कसबेकर, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ सदस्य डॉ. धनंजय वेळूकर, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. शारदा नायडू आदी उपस्थित होते. पूर्वी आणि वर्तमान खेळांमध्ये झालेल्या बदलांची माहिती देत डॉ. पांडे यांनी खेळण्याकरिता पूर्वी पैसे खर्च करण्याची वेळ येत नव्हती असे सांगितले. राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुणे भेटीचा प्रसंग आपल्या भाषणातून विशद केला. यातून माॅ जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांना कशाप्रकारे घडविले याबाबत माहिती दिली. अफजल खान, सिद्धी जोहर यांच्या तावडीत असताना त्या प्रसंगाने जिजाऊंच्या मनाची काय अवस्था झाली असेल, याचा विचार आपण करू शकतो. त्याचप्रमाणे तुमचा मुलगा-मुलगी खेळण्याकरिता बाहेर गेला असेल तर अशीच अवस्था पालकांची होते, अशा पांडे म्हणाल्या. उत्तम प्रकारचे खेळाडू तयार व्हावेत म्हणून विद्यापीठ खेळांसाठी चांगली व्यवस्था करीत आहे. क्रीडा भारती देखील सोबत असून मुलांना खेळ व शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे आवाहन त्यांनी केले. खेळाडू असल्याने तुमच्या परिसरातील नागरिक तुमच्याकडे आदर्श म्हणून पाहतात. त्यामुळे आदर्श बनल्यानंतर खेळाडूंना देखील शिस्तीत राहावे लागेल असे पांडे म्हणाल्या. यावेळी क्रीडा भारतीचे राष्ट्रीय सहमंत्री प्रसन्न हरदास, डॉ. धनंजय वेळूकर, डॉ. संतोष कसबेकर यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी केले. संचालन डॉ. अर्चना कोत्तेवार यांनी केले तर आभार डॉ. शारदा नायडू यांनी मानले. कार्यक्रमाला सत्कारमूर्तींसह त्यांच्या परिवारातील सदस्य व खेळाडू उपस्थित होते.
शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ – डॉ. कोठेकर
खेळामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहत असल्याचे प्रतिपादन भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय संघटन मंत्री डॉ. मनीषा कोठेकर यांनी केले. आजही अनेकजण क्रीडा क्षेत्राकडे उपेक्षित नजरेने बघतात. ज्यांना शिक्षणात जमत नाही असे विद्यार्थी खेळाकडे वळतात असे बोलले जाते. खेळ खेळणे म्हणजे वेळ वाया घालवणे असे काहीसे चित्र समाजात आहे. मात्र, खेळाडूंना भविष्यात उज्वल संधी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात करियर करावे असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमात मातांचा सत्कार
या कार्यक्रमांमध्ये वीर जिजामाता पुरस्कार देऊन खेळाडूंच्या मातांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये हरजाना शादाब, अरुणा गोडबोले, किरण भगत, मेधा राजे, तृप्ती बनसोड, ममता ठक्कर, मुमताज पठाण, अनुष्का पारखी, विजया वालदे, मनीषा घोडेस्वार, वैशाली कडू, अंबिका ताम्हणकर, ऐश्वर्या दुबळे (बहिण), अर्चना फरकाडे, विद्या फडके, तृप्ती बांगडीया, टीना थॉमस जेनिफर, साधना होळकर, सुनंदा पांडे, कुमारी पुनाराम गवार, वनिता चुटे, शोभा श्रीरामे, संगीता सेलोकर, गीता शेंडे, सारिका बकाले, सिंधू आंबुलकर, शालिनी गायमुखे, निर्मला देशमुख, वंदना कांगाले, सुवर्णा राखडे, लताबाई राऊत, धनश्री टिचकुले, बिंदू नेरिकर, संघमित्र वंजारी, कुंदा मुळे, मंजुषा वरदिलवार, ललिता सलाम, संगीता बाजीराव, रेखा भास्कर, सीमा भक्ते, माधुरी सहारे, सरिता मंत्री, सुरय्या शेख, शोभा राठोड, मदिना बेगम, अनिता जामगडे, लक्ष्मी सहारे, जयलता हनवते, मंजुलता धनखरे, शकुंतला तिवारी, भाविशा लाखानी, सविता मिश्रा, वैशाली तितरमारे, सुनिता हिवरकर यांचा समावेश आहे.