२५ वर्षा नंतर रंगला पारशिवनी येथे व्हालीबाल चा सामना…. 

दिमाखदार सोहळ्यात आमदार अड. आशिष जैस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन. 

न्यू आदर्श व्हाॅलीबाॅल मंडळ पारशिवनी तर्फे आयोजन.

पारशिवनी :- पारशिवनी शहरातील लोप पावत चाललेल्या क्रिडा संस्कृतीला २५ वर्षाच्या प्रदिर्घ खंडानंतर नव्या जोमाने सुरू करण्याचा संकल्प करूण समाजसेवी सलीम बाघाडे यांनी पारशिवनी शहरातील क्रिडा प्रेमीना व्हाॅलीबाॅल प्रतियोगीता चे भव्य आयोजन करून आगळी वेगळी भेट दिली आहे.

पारशिवनी येथील कुंवारा भिवसेन मैदानावर न्यू आदर्श व्हाॅलीबाॅल मंडळ पारशिवनीच्या वतीने व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दिंनाक ७ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता आमदार अड आशिष जयस्वाल यांच्या हस्ते व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उद्घाटन करूण स्पर्धा सुरू करण्यात आल्या.

याप्रसंगी आयोजक सलीम बाघाडे. डॉ. इरफान अहमद शेख. प्रतिभा कुंभलकर ( नगराध्यक्षा नगर पचायत पाराशिवनी). प्रकाशभाऊ डोमकी (माजी सरपंच.) दिपक शिवरकर ( नगर सेवक), विरेन्द्र भाऊ गजभिये, राहुल ढगे ( नगरसेवक.) हरीश बांगडकर, रोषन पिंपळामुळे, पारशिवनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहूल सोनवणे, जगदीश मोहोड , पत्रकार गोपाल कडू सह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पारशिवनी शहरातील जेष्ठ व्हाॅलीबाॅल पटू यांचा आमदार अड आशिष जयस्वाल व मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. त्यांत गंगाधर ईटनकर, अत्ताऊल्लाह पठाण, राजकुमार राऊत, फिरोज शेख, नाजिर पठाण, संजय व्यास, शंकर भिवगडे, आदिना गौरविण्यात आले.

या व्हाॅलीबाॅल स्पर्धेत प्रथम पारितोषिक २० हजार रुपये रोख व्दितीय पुरस्कार १५ हजार रुपये रोख बेस्ट आँल राऊंडर २५०० रूपये बेस्ट स्मॅचर ला २५०० रूपये व बेस्ट डिफेंन्डर २५०० रूपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ७५० रूपये प्रवेश फी आकारली आहे.

ठाणेदार राहूल सोनवणे यांनी सुद्धा बक्षीस जाहीर केले आहे. ( २५ वर्षा नंतर होत आहे पारशिवनी शहरात व्हाॅलीबाॅल स्पर्धा) पारशिवनी शहरात व्हाॅलीबाॅल खेळाडू पट्टीचे चॅपियंन आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात आपल्या खेळाने जिल्हात नव्हे तर विदर्भात पारशिवनी शहराचे नाव लौकीक केलेला होता.

पण गेल्या २५ वर्षा पासुन शहरात व्हाॅलीबाॅल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले नव्हते त्यामुळे व्हाॅलीबाॅल खेळाडूची निराशा होत होती.पण आता पारशिवनी शहरात २५ वर्षा नंतर पुन्हा व्हाॅलीबाॅल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे जेष्ठ व्हाॅलीबाॅल खेळाडूना आनंद झाला आहे. व आता पुन्हा व्हाॅलीबाॅल खेळाडू शहराचे नाव लौकीक करण्यात यशस्वी करण्यासाठी खेळणार यांचे समाधान जेष्ठ खेळाडूंना आत्मविश्वास निर्माण झाला आहे. शहरात या स्पर्धेचे आयोजनाने नवचैतन्य निर्माण केले आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor presents 'Sahitya Ganga' Awards of Uttar Bhartiya Mahasangh

Mon Jan 9 , 2023
Mumbai :-Governor Bhagat Singh Koshyari attended the Gaurav Samaroh and ‘Sahitya Ganga’ Awards presentation ceremony on the occasion of completion of 28 years of service by Uttar Bhartiya Mahasangh at Raj Bhavan Mumbai. National President of the Mahasangh Dr Yogesh Dube and former MLA Raj Purohit were present. The Governor presented the ‘Sahitya Ganga’ Puraskars to 35 personalities including O […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com